मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. कलाकारांचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडतो. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे.त्यात सध्या या मालिकेत बबिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे वादात फसली आहे.
मुनमुनला एका व्हिडिओमध्ये जातिवाचक शब्द वापरणं महागात पडलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत मुनमुनने जातिवाचक भाष्य केलं होतं.
त्यानंतर बबिताला मालिकेतून बाहेर काढण्यात येणार असल्याची ही चर्चा रंगली होती. मुनमुनविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या मेकर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मेकर्सचा मोठा निर्णय
अभिनेत्री मुनमुन दत्ताने जरी सगळ्यांची माफी मागितली असली, तरी अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी शोच्या मेकर्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांकडून अंडरटेकिंग साईन करुन घेतलं जाणार आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे.
बबिताची मालिकेतून एक्झिट?
असित मोदी यांच्या मते मुनमुन दत्ताने माफी मागितली असली तरी ही प्रकरण पुर्णपणे संपलेलं नाही. पुढे अशा गोष्टी कलाकारांकडून होऊ नये यासाठी अंडरटेकींग साईन करुन घेणंच योग्य आहे.
तर पुढील काही दिवसांसाठी बबिता या पात्रासाठी कोणतेही डायलॉग लिहिले जाणार नसल्याचं ही बोलंल जातयं. बबिताचं पात्र हे स्क्रिनवर दिसणार नाही. सेटवर कोणता ही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.