अचानक प्रकृती बिघडल्यामुळं अभिनेत्री रातोरात रुग्णालयात दाखल; चेहऱ्याला सूज, आवाजही ओळखता येईना अशी अवस्था...

अभिनेत्रीच्या पतीनं ब्लॉग शेअर करत ही माहिती दिली आहे. 

Updated: Aug 11, 2022, 03:25 PM IST
अचानक प्रकृती बिघडल्यामुळं अभिनेत्री रातोरात रुग्णालयात दाखल; चेहऱ्याला सूज, आवाजही ओळखता येईना अशी अवस्था... title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली होती. आता बातमी येत आहे की 'बिग बॉस' फेम संभावना सेठची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नाहीये. संभावनाला ताप आला होता, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फक्त ताप नाही तर भावनाल्या उलटी देखील सुरु होत्या. संभावनाची प्रकृति ठीक नसल्याची माहिती तिचा पती अविनाश द्विवेदीनंनं ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले. याची माहिती त्यानं काही दिवसांपूर्वी केली होती. 

आणखी वाचा : 'या' 5 राशींच्या व्यक्तींसाठी यंदाचं रक्षाबंधन म्हणजे सुवर्णक्षण; जाणून घ्या तुम्हाला होणार का याचा फायदा

संभावनाचा पती अविनाश द्विवेदीनं सांगितलं की, 'संभावनाला ताप आहे. यामुळे तिला खूप त्रास होत आहे. संभावनाला आधीच डोकेदुखी आणि ताप होता, परंतु आता तिला खोकला आणि सर्दी आणि सतत उलट्या होत आहेत. संभावनाची तब्येत इतकी बिघडली होती की तिला दवाखान्यात न्यावे लागले.

आणखी वाचा : सुनिधी चौहानविरोधात शिवसेनेची तक्रार; पाकिस्तानशी का जोडलं जातंय नाव?

अविनाश आपली सर्व कामं सोडून संभावनाला सांभाळत आहे. ब्लॉगमध्ये संभावनाचा चेहरा सुजल्याचं दिसत आहे. संभावना या ब्लॉगमध्ये बोलताना दिसते की ती आजकाल एका भयंकर आजाराशी झुंज देत आहे. हा आजार दुसरो कोणता नसून संधीवात (Arthritis) आहे. व्हिडीओमध्ये भावना भावूक झाली आणि IVF प्रक्रियेपासून ते संधिवातापर्यंत तिच्या मनातल्या गोष्टी देखील उघडपणे बोलली. संभावनाला सांगितले की, या आजारामुळे तिला चालण्यास त्रास होत आहे. तिच्या हात-पायांमध्ये नेहमी सूज, वेदना, आणि जड होतात.

आणखी वाचा  : 'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला बाहेरचा रस्ता?

संभावना ही बऱ्याचवेळा IVF प्रक्रियेतून गेली आहे. तरी देखील अभिनेत्रीचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही.  IVF मुळे संभावनाला शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तिच्या शरीरात हार्मोनल बदल होत आहेत. ज्यामुळे तिचं वजन वाढले आणि तिच्या मणक्याचे आजर होत आहेत.