मुंबई : सेलब्रिटी अनेकदा त्यांच्या एकापेक्षा एक अशा हटके फोटोशूटमुळे चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईलिंगची विशेष चर्चा पाहायला मिळते. त्यात त्यांनी एखादा हटके लूक केला कि तो फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो.अभिनेत्री अमृता देशमुख देखील तिच्या नवनवीन इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तर कधी तिचे रिल व्हिडिओ देखील चाहत्यांची मोठा प्रमाणात पसंती मिळवताना दिसतात.
सोशल मिडीयावर सतत अॅक्टीव्ह असणाऱ्या अमृताने नुकतेच पैठणीतील काही फोटो शेअर केलेत.यात तिचा मराठमोळा अंदाज चांगलाच भाव खाऊन जातोय. ही सिटी गर्ल जेव्हा साडीतील फोटो शेअर करते तेव्हा तिच्या फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
फ्रेशर्स, सारे तुझ्याचसाठी या मालिकांमध्ये अमृता झळकली आहे. तर 'स्विटी सातारकर' या सिनेमामधून अमृताने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
अमृताच्या साडीतील या सुंदर फोटोशूटने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या फिकट गुलाबी रंगाच्या पैठणी साडीवर अमृताने अगदी शोभून दिसेल अशी ज्वेलरी देखील परिधान केली आहे.याआधी ही अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या लग्नात अमृताने केलेला लूक चांगलाच चर्चेत होता.