'लाज वाटायला पाहिजे...' बप्पी लहरींसोबत अभिनेत्रीचा 'तो' फोटो, चाहते भडकले

अभिनेत्रीचा बप्पी लहरींसोबत 'तो' फोटो पाहाताचं भडकले चाहते, नक्की काय आहे त्या फोटोमध्ये? फोटोमुळे चर्चांना उधाण  

Updated: Feb 25, 2022, 11:02 AM IST
'लाज वाटायला पाहिजे...' बप्पी लहरींसोबत अभिनेत्रीचा 'तो' फोटो, चाहते भडकले  title=

मुंबई : ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबत बॉलिवूडला मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटींनी बप्पी दा यांच्यासोबत फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. दरम्यान एका अभिनेत्री बप्पी दा यांच्यासोबत एक फोटो फोटो पोस्ट केला, ज्यामुळे चाहते चांगलेच भडकले आहेत. 

अभिनेत्री अदा शर्माने फोटोमध्ये दागिने घातले आहेत. आदाने स्वतःचा आणि आणि बप्पी दांचा फोटो कोलाज करत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमधील अदाच्या कपड्यांवरून देखील तिला ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर 'प्रसिद्धीसाठी दिग्गज व्यक्तींच्या फोटोंचा वापर का?' असा प्रश्न देखील तिला युजर्स विचारत आहेत. तर काही तुला लाज वाटायला पाहिजे असं म्हणत आहेत. 

एका मुलाखतीत बप्पी दा यांनी सांगितलं सोनं घालण्याचं कारण... 
बप्पी लहरी यांना असणारं हे मौल्यवान दागिन्यांचं वेड शब्दांत मांडता येणार नाही असं होतं. एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारणंही सांगितलं होतं. 

'Elvis Presley हे अमेरिकन गायक ह़ॉलिवूडमध्ये सोन्याची साखळी गळात घालत असत. मला ते फार आवडत होते. त्याचवेळी मी ठरवलं की मी यशस्वी होऊन ते यश वेगळ्या पद्धतीने साजरा करेन. त्या क्षणी मी खूर सारं सोनं वापरू लागलो, सोनं माझ्यासाठी भाग्याचं प्रतीक आहे', असं ते म्हणाले होते.