मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात सोशल मीडियावर चांगलाच संताप वक्त होताना दिसत आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता दिग्दर्शक महेश भट्ट यांचा देखील जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, 'याप्रकरणी उद्या महेश भट्ट यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. शिवाय अभिनत्री कंगना रानौतला देखील चैकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गरज भासल्यास करण जोहरची देखील चौकशी करण्यात येईल.' अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळाफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खानवर सडकून टीका केली.
शिवाय, वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांसारख्या स्टारकिड्सवर टीका होत आहे. शिवाय सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झाली असून कंगना रानौत सारख्या कलाकारांच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे.