मुंबईः अभिनेता सोनू सुद हा बॉलीवूडचा एक आघाडीचा नायक आहे. खलनायकापासून नायकापर्यंत, ऐतिहासिक भुमिकांपासून ते स्टंटबाज कलाकारापर्यंत त्याची ख्याती बॉलीवूडमध्ये पसरली आहे. दोन वर्षांपुर्वी करोनाच्या पार्श्वभुमीवर सोनु सूद हा अभिनेता गरजूंच्या मदतीसाठी धावून आला होता.
सोनू सूदने इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे पण त्याचा कल हा अभिनयाकडे जास्त होता. त्यामुळेच त्याने आईला सांगितले होते की, ''मला दीड वर्षांसाठी मुंबईला जायचे आहे आणि मला अभिनेता व्हायचे आहे. मला हे एकदा करून बघू दे आणि मी काही झालो नाही तर मी माझ्या वडिलांसोबत त्यांचा कपड्यांचा व्यवसाय पुढे सांभाळेन.'' पण सोनू सूदला सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटात काम मिळू शकले नाही. साऊथच्या इंडस्ट्रीत त्याला अनेक चांगले चित्रपट हे मिळू लागले. त्यामुळे बॉलीवूडमध्येही त्याचे स्वागत झाले.
सोनु सुदला बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 'दबंग' या चित्रपटामुळे. त्यात त्याने साकारलेला विलिन चेढ्ढी सिंग हा प्रचंड गाजला. सलमान खान म्हणजे चुलबुल पांडे चेढ्ढी सिंगला एक डायलॉग ऐकवतो जो सलमानचा त्या चित्रपटाला लोकप्रिय डायलॉग आहे. तो म्हणजे ''इतने छेद करेंगे की समझ में नहीं आयगा सान्स कहा से ले और...'' हा डायलॉग सिनेमाच्या लेखकांनी लिहिला नसून तो खुद्द सोनु सूदनेच लिहिला होता. तूम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या काय आहे यामागेच कारण..
'दबंग' चित्रपटाचे सर्व संवाद दिलीप शुक्ला यांनी लिहिले आहेत पण हा संवाद सोनू सूदने लिहिला आहे. या संवादाशिवाय सोनूने 'कौन के हाथ और छेदी सिंह की लात वेरी लॉन्ग है' या चित्रपटाचा आणखी एक संवादही लिहिला आणि विशेष म्हणजे सलमान खानलाही याची माहिती होती. सोनू सूदने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याला लिहिण्याची आवड आहे आणि तो नेहमी काहीतरी लिहित राहतो. चित्रपटात काही त्रुटी असतील तर सोनू तो चित्रपट करत नाही याच कारणामुळे त्याने 'दबंग 2' केला नाही.
त्यांच्या कारकिर्दीतील पहिला तमिळ चित्रपट 'कालजाघर' हा होता. त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट 'शहीद-ए-आझम भगतसिंग' होता.