धक्कादायक... अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का

Updated: Sep 2, 2021, 11:57 AM IST
धक्कादायक... अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं  निधन title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.  हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे. सिद्धार्थच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या कूपर रूग्णालयात त्याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध खाल्लं होतं. त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा उठलाचं नाही. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉतक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.

12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.