अक्षय कुमारसोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यावर आली वाईट परिस्थिती; पैशांसाठी करावं लागत 'हे' काम

हा अभिनेता 'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल' आणि 'पटियाला हाऊस' सारख्या सिनेमात दिसाला आहे.

Updated: Dec 21, 2022, 07:33 PM IST
अक्षय कुमारसोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यावर आली वाईट परिस्थिती; पैशांसाठी करावं लागत 'हे' काम title=

मुंबई : सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. मात्र असे अनेक कालाकार आहेत जे उंचीच्या शिखरावर गेले आणि काहि वर्षांनी त्यांच्याकडे काहिच काम नव्हतं. यामुळे त्यांना एक्टिंग सोडून नोकरी करावी लागली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्याने अभिनयात आपली ओळख कमावली मात्र आता त्याच्याकडे काहीच काम नाहीये आणि यामुळेच त्याला पोटा पाण्यासाठी नोकरी करावी लागते.

आज आम्ही बोलतोय अक्षय कुमारचा कोस्टार सवी सिद्धूबद्दल.समोर आलेल्या बातमी नुसार हा अभिनेता त्याचं घर चालवण्यासाठी सिक्योरिटी गार्डची नोकरी करत आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्याचं दुख: व्यक्त केलं आहे. सवी सिद्धूने आपल्या करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या फिल्म 'पाँच'मधून केली जी कधीच रिलीज होऊ शकली नाही. 

'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल' आणि 'पटियाला हाऊस' सारख्या सिनेमात दिसाला आहे. सावी सिद्धू मुंबईतील मालाड येथे सिक्योरिटी गार्डची नोकरी करत आहे.  फिल्म कँम्पेनियन व्दारा युट्यूबवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत सावीने आपल्या संघर्षाच्या दिवसांवर भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना सावी सिद्धूने सांगितलं की, माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ तो होता जेव्हा माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर माझ्या वडिलांचही निधन झालं. त्यानंतर आईचं निधन झालं. हळू-हळू मी एकटा पडत गेलो.'' 

अभिनेत्याने पुढे सांगितलं की, ''सेक्योरिटी गार्डची नोकरी हा सगळ्यात कठिण जॉब आहे. कारण ईथे 12 तास काम करावं लागतं. हे एक मशिनी काम आहे. माझ्याकडे बसचं तिकीट खरीदण्यासाठीही पैसे नाहीयेत. आता थिएटरमध्ये सिनेमा पाहणं तर फारच कठिण आहे माझ्यासाठी. माझी हालत बिल्कूल ठिक नाहीये.''

आजच्या घडीला आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे चित्रपटांमध्ये काम करण्याऱ्या सवी यांना चित्रपट पाहणंही एका स्वप्नाप्रमाणेच वाटत आहे. येत्या काळात आपण, पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यास तयार असल्याचं म्हणत या कलाविश्वाकडूनही सकारात्मकतेने त्यासाठीची तयारी दाखवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हळूहळू एक-एक अडचण दूर सारणारे सवी यांनी परिस्थितीसाठी कोणालाही दोष न देता, याच परिस्थितीतून डोकं वर काढत जणू आयुष्याकडे पाहण्याता एक हसरा, बोलका आणि तितकाच सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे, असंच म्हणावं लागेल.