Actor who's father shot everyone in the family : 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेता कमल सदानाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कमल सदानाचा पहिलाच चित्रपट हा काजोलसोबत होता. त्यामुळे कमल खूप उत्साही होता. पण करिअरमध्ये यशस्वी होण्याआधीच त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. याविषयी कमलनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. कमलनं खुलासा केला की त्या दिवशी त्याच्यासमोर त्याच्या वडिलांनी त्याची आई, बहीण आणि त्याला गोळी मारली होती. तर त्यानंतर स्वत: ला गोळी मारत आत्महत्या केली होती.
कमलनं ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिली होती. यावेळी कमल म्हणाला, मला पण गोळी लागली होती. मानेच्या एका बाजूनं निघून दुसऱ्या बाजूनं गोळी बाहेर पडली. पण मी सर्व्हाईव केलं. मी सर्व्हाइव करण्याना मागे काही लॉजिक नाही, मला वाटतं की ती गोळी कोणत्याही नर्व्ह्सला धक्का न देता दुसऱ्या बाजून निघाली. त्यामुळे मी वाचलो. मी त्यातून बाहेर निघालो आणि जगण्याचा विचार केला.
याविषयी सांगत कमल म्हणाला, माझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हा प्रकार घडला. याचा अर्थ असा नाही की माझं बालपन किंवा माझं कुटुंब हे खराब होतं, असं काहीही नाही. जेव्हा वडिलांनी आई आणि बहिणीसोबत मला गोळी मारली तेव्हा मी त्या दोघांना रुग्णालयात घेऊन गेलो. पण त्यावेळी मला माहित नव्हतं की मला गोळी लागली आहे. रुग्णालयात देखील बेड्स खाली नव्हते तर माझा मित्र मला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेला. मी डॉक्टरांना म्हटलं की आई आणि बहिणीला जिवंत ठेवा. वडिलांकडे देखील माझं लक्ष होतं.
पुढे कमल म्हणाला, "माझ्या मानेतून गोळी गेली होती म्हणून माझी देखील सर्जरी झाली होती. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला घरी घेऊन जाण्यात आलं आणि मी पाहिलं माझं संपूर्ण कुटुंब जमिनीवर आहे, तेही माझ्या डोळ्यासमोर... अनेक वर्ष मी माझा वाढदिवस साजरा केला नाही. पण काही वर्षांपूर्वी मी पार्टी दिली. पण आजही मला माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होत नाही. मित्र घरी येतात, माझा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण ही घटना माझ्या डोक्यातून निघत नाही. वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या गोष्टी परत आठवू लागतात."
हेही वाचा : ...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!
"मी आजही त्याच घरात राहतो, जिथे हे सगळं घडलं. मी एकटा नाही, ज्यानं हे सगळं पाहिलं, किंवा त्याच्यासोबत हे घडलं. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी माझ्यापेक्षा जास्त वाईट घटना त्यांच्या आयुष्यात पाहिली आहे."कमल सदनच्या कामाविषयी बोलायचं झालं तर आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. नुकताच तो 'पीपा' मध्ये दिसला होता.