'या' विवाहित अभिनेत्रीची R. Madhavan ला भुरळ, पहिल्यांदाच घेतलं 'तिचं' नाव

नुकतेच आर माधवनचे एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे.

Updated: Jul 28, 2022, 10:14 AM IST
'या' विवाहित अभिनेत्रीची R. Madhavan ला भुरळ, पहिल्यांदाच घेतलं 'तिचं' नाव title=

R Madhavan : आर माधवन या अभिनेत्याचा नुकताच 'रॉकेटरी - द नांबी इफेक्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला असून आर माधवनच्या अभिनयाचे सगळीकडेच कौतुक होतं आहे. शास्त्रज्ञ नांबी नारायणयन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट सहा भाषांमध्ये जगभर प्रदर्शित झाला आहे. 

नुकतेच आर माधवनचे एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे. त्यात त्याने बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल एक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे बिपाशा बासू. बिपाशा बासू आणि आर माधवन 2012 साली 'जोडी ब्रेकर्स' या चित्रपटातून एकत्र दिसले होते. त्या चित्रपटात आर माधवनने आपल्या आणि बिपाशाबद्दलच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमेस्ट्रीबद्दल सांगितले. 

त्यात तो बिपाशाबद्दल म्हणाला की, ''मी बिपाशाच्या सौंदर्यावर भाळलो आहे. ती अत्यंत आकर्षक आहे. जेव्हा तूम्हाला ऑनस्क्रीन रॉमान्स करायचा असतो तेव्हा त्याचसोबत तूम्ही ज्या कोस्टारसोबत काम करतायत त्या व्यक्तीकडे आकर्षक होणे गरजेचे असते नाहीतर त्याशिवाय कॅमेरासमोर ती केमेस्ट्री आणि तो रोमान्स सहजपणे दिसून येत नाही. आणि 'जोडी ब्रेकर्स'च्या वेळीही मी बिपाशाकडे आकर्षित झालो होतो. सेटवर आमचे नाते कसे होते मला माहित नाही पण तिच्यासोबत काम करताना मला असं कधीच जाणवलं नाही की आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो आणि मला हेही जाणवलं नाही की ती बॉलीवूडची खूप मोठी स्टार आहेत'', अशी कबूली आर माधवनने दिली होती. 

बिपाशा बासू 2016 साली करन सिंग ग्रोव्हरशी विवाहबंध झाली आहे. त्यापुर्वी 11 वर्षे जॉन इब्राहिमला डेट करत होती.