नेपोटिझमच्या प्रश्नावर जान्हवी असं काही बोलली, की पुन्हा तिला 'हा' प्रश्नच कोण करणार नाही!

जान्हवी आणि अर्जून जास्तच ट्रोल होतं आहेत आणि एव्हानाही निमित्त आहे ते नेपोटिझमचं.

Updated: Jul 28, 2022, 09:52 AM IST
नेपोटिझमच्या प्रश्नावर जान्हवी असं काही बोलली, की पुन्हा तिला 'हा' प्रश्नच कोण करणार नाही! title=

Janhavi Kapoor : मागच्या वर्षी अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच एकत्र चित्रपटातून काम करणार असल्याची बातमीसमोर आली होती. तेव्हापासून चर्चांना मोठं उधाण आलं होतं. पुन्हा एकदा नेपोटिझमच्या चर्चा रंगल्या होत्या. आता जान्हवीचा 'गुडलक जेरी' आणि अर्जून कपूरचा 'एक विल्हन रिटर्न' हे दोन चित्रपट एकाचवेळी क्लॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जान्हवी आणि अर्जून जास्तच ट्रोल होतं आहेत आणि एव्हानाही निमित्त आहे ते नेपोटिझमचं.

दोन वर्षांपुर्वी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेला हा नेपोटिझमचा खेळ काही केल्या संपत नसून बॉलीवूडमध्ये आता स्टार कीड्च्या बाबतीत काहीही नवं घडलं की त्याला नेपोटिझमचं नावं दिलं जातं. आता पुन्हा काहीसं असंच झालं आहे. जान्हवी कपूर ही सध्या आपल्या 'गुडलक जेरी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तेव्हा तिला असेच अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ती आपल्या भावासोबत म्हणजेच अर्जून कपूरसोबत लवकरच एका चित्रपटातून दिसणार आहे. अद्याप त्या चित्रपटाचे नाव समोर आले नाही त्यामुळे अर्जून आणि जान्हवी या दोन स्टार कीड्सना एकत्र एका चित्रपटासाठी पाहून ट्रोलर्सनी त्या दोघांना प्रचंड ट्रोल केले. 

एका आठवड्यापुर्वी जान्हवीला आपल्या परिवारातल्या सदस्यासोबत एकत्र काम करणार की नाही यावर प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ती म्हणाली होती की, ''खरंतर सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात. तरी आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवतो. त्यातूनही मला सगळ्यासोबत काम करायला आवडेल आणि आम्ही सगळेच ज्या चित्रपटात काम करू त्या चित्रपटाला 'नेपोटिझम' असं नाव देण्यात येईल, तेव्हा यावरून नुकताच जान्हवीला प्रश्न करण्यात आला. त्यावर तिने गमतीशीर उत्तरं दिलं. 

ती म्हणाली, ''मी तेव्हा मुलाखतीत जे काही बोलले होते तेव्हा मी झोपले होते. मला कल्पना नाही मी नक्की काय बोलले होते. मी दिवसाला पंधरा ते वीस इंटरव्ह्यू देते त्यामुळे मी असंच काहीतरी बरळले असेन'', अशी कबूली तिने नुकत्याच एका तिच्या मुलाखतीतून दिली. 

जान्हवी कपूर लवकरच आपल्या आगामी 'गुडलक जेरी' या चित्रपटातून दिसणार आहे.