अमिताभ, राजेश खन्ना दोघेही सुपरस्टार; पण टिकले फक्त बच्चन! प्रेम चोप्रांनी सांगितलं खरं कारण

Prem Chopra on Rajesh Khanna Stardom: राजेश खन्ना हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यांच्या अभिनयानं आपल्या प्रत्येकाची मनं जिंकून घेतलेली आहेत. सध्या प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या स्टारडमवर कमेंट केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 11, 2023, 01:30 PM IST
अमिताभ, राजेश खन्ना दोघेही सुपरस्टार; पण टिकले फक्त बच्चन! प्रेम चोप्रांनी सांगितलं खरं कारण title=
August 8, 2023 | actor prem chopra comment on rajesh khanna and amitabha bachchan stardom latest bollywood news in marathi

Prem Chopra on Rajesh Khanna Stardom: 70-80 दशकात सर्वात लोकप्रिय सिनेअभिनेता कोण असेल तर ते होते राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या चित्रपटांचे आजही आपण प्रचंड मोठे फॅन आहोत. आजही त्यांचे चित्रपट पहिल्याशिवाय आपणही राहत नाही. त्यावेळी नायक-खलनायकाची जोडी ही अनेकदा रूपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे नायक म्हणून राजेश खन्ना यांची प्रतिमा तेव्हाच्या तरूणपिढीवर चांगलीच उमटली होती. आज हृतिक रोशन, शाहरूख खान, सलमान खान असे स्टार लोकप्रिय असून ते आजच्या काळातील सुपरस्टार आहेत. परंतु त्यावेळी अभिनेता राजेश खन्ना यांनी ही किमया साकार केली होती. त्यांच्या आगळ्यावेगळ्या भुमिकेनं आणि त्यांच्या संवादशैलीनं तर तेव्हाच्या हरएक प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत परंतु तुम्हाला माहितीये का राजेश खन्ना यांची लोकप्रियता कालातंरानं आटू लागली होती. 

सध्या ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्या स्टारडमवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या स्टारडमवर भाष्य केले आहे. 'बॉलिवूड ठिकाणा'ला देत असलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रेम चोप्रा हे 70-80 च्या काळातले सर्वात लोकप्रिय असे खलनायक होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असायची. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जण तेव्हा प्रचंड फॅन्स होते. त्याहूनही त्यांनी त्यानंतर आपल्या खलनायकाच्या प्रतिमेतून बाहेर येत कॅरेक्टर रोलमध्ये येण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा होती. प्रेक्षकांनी त्यांना या नव्या भुमिकांमधूनही पाहायला सुरूवात केली होती व त्यांना त्यांचा अभिनय आवडतही होता. 

हेही वाचा - बघण्याच्या कार्यक्रमात सासुबाईंसमोरच म्हटली लावणी... वंदना गुप्तेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा

प्रेम चोप्रा यांनी यावेळी या मुलाखतीत म्हटले आहे की राजेश खन्ना यांनी काळानुसार त्यांना अपडेट केले नाही आणि त्यामुळे त्यांच्या स्टारडमवर त्याचा परिणाम झाला. त्यातून अमिताभ बच्चन यांनी येत्या पिढीला धरून काळाच्या बरोबर जात स्वत:ला आत्तापर्यंत प्रस्थापित ठेवले आहे. त्यातून राजेश खन्ना यांना सेटवर उशिराही येण्याची सवय लागली होती. त्यातून त्यांच्याबद्दल तक्रारही होत्या परंतु त्यासंबंधी कोणीही काहीच त्यांच्याशी बोललं नाही. 

प्रेम चोप्रा यांनी एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी प्रेम चोप्रा म्हणाले की कॉल टाईम 9 चा असेल तर सर्वांनी 8.30 पर्यंत येणे तरी आवश्यक होते परंतु राजेश खन्ना मात्र दुपारी येयचे. यावेळी त्यांनी असेही सांगितले होते त्यांच्या या वाईट सवयीमुळे प्रोड्युसरसुद्धा त्यांच्यावर रागावलेले असायचे.