अभिनेता प्रवीण तरडे यांची अचानक घोषणा आणि चाहत्यांचा सवाल, "भाऊ... नेमकं सांगा, कधी, कुठे?''

अभिनेता प्रवीण तरडे यांनी अचानक फेसबूकवर चाहत्यांसाठी एक घोषणा केल्याने चाहते अवाक झाले आहेत, प्रवीण तरडे यांना प्रश्न विचारु लागले आहेत,

Updated: Jun 5, 2021, 09:19 PM IST
अभिनेता प्रवीण तरडे यांची अचानक घोषणा आणि चाहत्यांचा सवाल, "भाऊ... नेमकं सांगा, कधी, कुठे?'' title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : अभिनेता प्रवीण तरडे यांनी अचानक फेसबूकवर चाहत्यांसाठी एक घोषणा केल्याने चाहते अवाक झाले आहेत, प्रवीण तरडे यांना प्रश्न विचारु लागले आहेत, भाऊ... नेमकं सांगा कधी कुठे? कारण अभिनेता प्रवीण तरडे हे लवकरच एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत याची कल्पना प्रेक्षकांना आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांचे जवळचे अनेक मित्र झिजले, त्यात काही निवडक साथीदार क्रूर कोरोनाने त्यांच्यापासून हिरावून नेले आहेत. हे दु:ख उराशी बाळगून, जड मनाने का होईना, प्रवीण तरडे हे फेसबूकवर म्हणतायत, ६ जून सकाळी ११ वा . नक्की बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिश्वर होताना...टीम सरसेनापती हंबीरराव.

एका प्रकारे रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्याचं आवाहन अभिनेता प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना केलं असावं असं प्राथमिक अंदाज यावरुन लावता येईल.      

 

या फेसबूक पोस्टचा नेमका अर्थ भोळा-भाबळ्या प्रेक्षकांनाही कळलेला नाही, या सिनेमाचा नेमका प्रिमिअर आहे, की तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय हे प्रेक्षकांना समजत नाहीय. यावर चाहत्यांनी प्रवीण तरडे यांना सवाल केला आहे,  "भाऊ... नेमकं सांगा, कधी, कुठे?''

प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, हे तेवंढच खरं आहे. प्रवीण तरडे हा अभिनेता मुळशी पॅटर्ननंतर खऱ्या अर्थाने नावारुपाला आला आहे, हे प्रवीण तरडे हे देखील नाकारणार नाहीत. जमीनीवरचे विषय आणि तसेच कडक संवाद चित्रपटात देण्याची धमक प्रवीण तरडेंमध्ये दिसून आली आहे.

प्रवीण तरडे यांच्यासारखा अभिनेता आणखी प्रखर प्रश्नांवर खरे बोलके चित्रपट घेऊन येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. यातच प्रवीण तरडे सरसेनापती हंबीरराव साकारत असल्याने त्यांच्या चित्रपटाची कोरोनाला डोळ्याआड करत वाट पाहत आहेत.