‘बाहुबली २’ ने जगभरात कमावले १७०० कोटी, प्रभासला केवळ इतकेच मिळाले

यावर्षीचा बॉक्स ऑफिस सेंसेशन ‘बाहुबली २- द कन्क्लूजन’ने जगभरात १७०० कोटी रूपयांची कमाई केली. पण यातून बाहुबलीची भूमिका साकारणा-या प्रभासला किती मिळाले हे वाचून थक्क व्हाल. 

Updated: Dec 26, 2017, 05:52 PM IST
‘बाहुबली २’ ने जगभरात कमावले १७०० कोटी, प्रभासला केवळ इतकेच मिळाले title=

मुंबई : यावर्षीचा बॉक्स ऑफिस सेंसेशन ‘बाहुबली २- द कन्क्लूजन’ने जगभरात १७०० कोटी रूपयांची कमाई केली. पण यातून बाहुबलीची भूमिका साकारणा-या प्रभासला किती मिळाले हे वाचून थक्क व्हाल. 

बाहुबलीचं रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन

‘बाहुबली २’ हा २०१७ मधील सर्वात यशस्वी सिनेमा ठरला. २८ एप्रिलला रिलीज झाल्यानंतर या सिनेमाने एकच धमाका केला. या सिनेमाच्या हिंदी डब व्हर्जनने ४१ कोटींची शानदार ओपनिंग मिळवली. तर १२८ कोटींचं अभूतपूर्व कलेक्शन ओपनिंग विकेंडमध्ये केला. यासोबतच ‘बाहुबली २’ हा सिनेमा ५११ कोटींची कमाई करणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला. तोही डब केलेला. जगभरात बाहुबलीने १७०० कोटींची कमाई केली. पण या तुलनेत प्रभासला मिळालेली रक्कम फारच कमी आहे. 

प्रभासने किती केली कमाई?

फोर्ब्सने २०१७ मधील सर्वात जास्त कमाई करणा-या १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. बाहुबलीची कमाई पाहता प्रभास या यादीत बराच वर असेल असा अंदाज अनेकांनी लावला होता. पण तसे झाले नाही. प्रभास या यादीत २२व्या स्थानावर आहे. त्याने २०१७ मध्ये ३६.२५ कोटी रूपयांची कमाई केली. प्रभासने ‘बाहुबली’नंतर एकही दुसरा सिनेमा साईन केला नाही. तो दोन वर्ष केवळ बाहुबली सिनेमावरच काम करत होता. तरीही त्याने ३६ कोटींची कमाई केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादीत दिग्दर्शक एसएस राजमौली हे १५व्या स्थानवर आहेत. त्यांनी ५५ कोटींची कमाई २०१७ मध्ये केली. 

इतर कलाकार यादीत नाहीत...

‘बाहुबली’ सिनेमातील भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबट्टी याची कमाई दोघांच्याही तुलनेत कमीच झाअली. या यादीनुसार राणाने २२ कोटींची कमाई केली आणि या यादीत तो ३६व्या स्थानावर आहेत. तर ‘बाहुबली २’मधून लोकप्रिय झालेल्या अनुष्का शेट्टी, सत्यराज,  राम्या कुष्णन यांना या यादीत जागा मिळाली नाही.