इरफानच्या मनात आई विषयीची कायम राहिलेली सल

इरफान खान सर्वात जास्त आईच्या जवळ होता 

Updated: May 1, 2020, 06:13 PM IST
इरफानच्या मनात आई विषयीची कायम राहिलेली सल  title=

मुंबई : अभिनेता इरफान खान यांच बुधवारी २९ एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झालं. इरफान यांच्यावर उपचार सुरूच होते. या रोगावर मात करत ते बरे होतात की काय? असं प्रेक्षकांना वाटत असतानाच त्यांनी या जगातून सगळ्यांचा निरोप घेतला. इरफान खान यांच असं जाण प्रत्येकालाच चटका लावून जाणार आहे. पण अभिनेता इरफान खान यांच्या मनात कोणती सल होती? ज्यामुळे ते अस्वस्थ होते. 

इरफान खान यांच्या आईचं २५ एप्रिल रोजी वयाच्या ९३ वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. इरफान खान यांना लॉकडाऊनमुळे आईचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. आईच्या जनाजामध्ये सहभागी न झाल्याचं दुःख त्यांना बोचत होतं. आईचं दुःख आपल्या भावासोबत वाटू न शकल्याची भावना इरफान यांच्या मनात होतीच. इरफान यांना कायम आईचा मायेचा हात आपल्या डोक्यावर असं वाटायचं. पण तसं कधी झालं नाही. आणि हीच सल त्यांच्या मनात राहिली असावी. 

कारण एका मुलाखतीत इरफानला तू जास्त कुणाच्या जवळचा आहेस आई की बाबा? असा प्रश्न विचारण्यात आलं. तेव्हा खऱ्या अर्थाने इरफान व्यक्त झाला होता. त्याने म्हटलं होतं की,'माझी खूप इच्छा असायची की, मी आईच्या खूप जवळ असावं. पण माझं आणि आईचं सतत भांडण व्हायचं. आमचा ३६ चा आकडा होता. मला आईला खूप खूष करायचं होतं. तसे मी प्रयत्न देखील केले. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवावा पण तसं कधीच झालं नाही. उलट काहीतरी वेगळंच व्हायचं.'

तसेच इरफान आईच्या मृत्यूनंतरही हे दुःख पचवू शकत नव्हते. इरफान यांच्या मृत्यूपूर्वी शेवटचे शब्द हेच होते की,'बघ, अम्मा मला न्यायला आली आहे. ती माझ्या अगदी बाजूला बसली आहे. अम्मा मला घेऊन जाण्यासाठी आली आहे.'

यावरून आपल्या लक्षात येतं की, इरफान यांच आईवर प्रचंड प्रेम होतं. पण लॉकडाऊनमुळे ते आईचं शेवटचं दर्शन देखील घेवू शकले नव्हते. आणि हीच सल त्यांच्या मनात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहिली.