Dhanush Affairs : 'या' बोल्ड अभिनेत्रीशी जोडलं गेलं धनुषचं नाव; एकीच्या नावानं सर्वांनाच हादरा

18 वर्षांच्या वैवाहिक नात्यात या जोडीमध्ये नेमका दुरावा का आला?

Updated: Jan 18, 2022, 12:26 PM IST
Dhanush Affairs : 'या' बोल्ड अभिनेत्रीशी जोडलं गेलं धनुषचं नाव; एकीच्या नावानं सर्वांनाच हादरा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता धनुष (Dhanush)यानं अभिनयाच्या बळावर कलाजगतामध्ये मानाचं स्थान मिळवलं. धनुषनं कायमच चाहत्यांच्या नजरा वळवल्या. मितभाषी धनुष सध्या चर्चेत आला आहे ते म्हणजे ऐश्वर्या रजनीकांत आणि त्याच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळं. 

18 वर्षांच्या वैवाहिक नात्यात या जोडीमध्ये नेमका दुरावा का आला, यासंबंधीचेच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करताना दिसत आहेत. 

दरम्यानच धनुषशी संबंधित काही वादाच्या गोष्टींनीसुद्धा आताच डोकं वर काढलं आहे, ज्याची बरीच चर्चा सुरु आहे. 

धनुष आमचा मुलगा... 
2017 मध्ये तामिळ दाम्पत्यानं धनुष आमचा मुलगा आहे असं सांगत न्यायालयात धाव घेतली होती. प्रतीमहिना 65 हजार रुपये मासिक रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली होती. 

आर कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांनी दावा केला होता की, धनुष त्यांचाच मुलगा आहे जो घरातून पळून गेला होता. 

इतकंच नव्हे तर धनुषनं जन्मखुणा हटवल्याचं सांगत त्याचं खरं नाव कलईचेवलन असल्याची माहिती या दाम्पत्यानं न्यायालयाकडे दिली होती. 

पण, धनुषनं हे सर्व दावे फेटाळत कस्तुरी राजा हे आपले वडील आणि विजय लक्ष्मी ही आपली आई असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

धनुषमुळं तुटलं अमाला पॉलचं नातं? 
अभिनेत्री अमाला पॉल 2014 मध्ये चित्रपट निर्माता ए.एल. विजय याच्याशी लग्नबंधनात अडकली. पण, 2016 मध्ये तिचा घटस्फोट झाला. 

सूत्रांच्या माहितीनुसार धनुष आणि अमालामध्ये वाढती जवळीत यासाठी कारणीभूत ठरली होती. पण, अमालानं या चर्चा कायम फेटाळून लावल्या होत्या. 

अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन हिच्याशीीही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. ही बाब सर्वांनाच हादरवणारी होती. 

Dhanush Aishwarya Divorce : एकाएकी घाईतच का झालेलं धनुष- ऐश्वर्याचं लग्न? 

'3' चित्रपटाच्या वेळी त्यांच्यातील जवळीक वाढली होती. धनुषची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिनंच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 

धक्कादायक बाब ही की ऐश्वर्या आणि श्रुती या बालपणीपासूनच्या मैत्रीणी. त्यातच धनुषची श्रुतीची वाढणारी सलगी अनेकांच्याच भुवया उंचावून गेली.