अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत दाखल

अभिनेत्याला रूग्णालयात केलं दाखल 

Updated: Jul 28, 2020, 04:22 PM IST
अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत दाखल title=

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेता अनुपम श्याम यांना मुंबईच्या गोरेगाव येथील एका रूग्णालयात दाखल केलं आहे. ६२ वर्षीय अभिनेता यांची तब्बेत बिघडली आहे. किडनीत संक्रमण झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री त्यांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अनुपम गेल्या नऊ महिन्यांपासून डायलिसिस करत आहे. एवढंच नव्हे तर यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट देखील कोसळलं आहे. 

अनुपम श्याम यांच्या शुभचिंतकांनी ट्विट करून त्यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावर आमिर खान आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली आहे. अनुपम यांचे चाहते खूप दुःखी झाले आहेत. लवकरच ते बरे होतील अशा आशा व्यक्त केली आहे. 

अनुपम श्याम 'मन की आवाज प्रतिज्ञा' टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते खऱ्या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात. 'सदरादी बेगम', 'बँडिट क्वीन', 'हजार चौरासी की माँ', 'दुश्मन', 'सत्या', 'दिल से', 'जख्म', 'प्यार तो होना ही था', 'कच्चे धागे', 'नायक', 'स्लमडॉग मिलेनियर' आणि मुन्ना सायकल सारख्या सिनेमात काम केलं आहे.