सुशांतसिंग राजपूत आत्महत्या । 'या' मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची पोलिसांना आज चौकशी केली.  

Updated: Jun 18, 2020, 12:58 PM IST
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या । 'या' मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी title=

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची पोलिसांना आज चौकशी केली. दरम्यान, तिच्याकडून पोलिसांनी काय जबाब नोंदवून घेतला आहे, याची माहिती मिळालेली नाही. आज वांद्रे पोलिसांनी रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर ती पोलीस ठाण्यात पोहोचली.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. सुशांत याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली  आहे. सुशांत याच्या बहिणीसह सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आज सुशांतची मैत्रीण   रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदविला गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच तिला चौकशी बोलविल्याचे एएनआयने वृत्त दिले आहे. 

वांद्रे येथील निवासस्थानी सुशांत याने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. वांद्रे पोलिसांनी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. गळफास लागल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांत याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. सुशांतसोबत राहणारे दोन मॅनेजर, एक स्वयंपाकी, सुशांतची खोली उघडण्यासाठी आणलेला चावीवाला, सुशांतची बहीण आणि त्याचा मित्र अभिनेता महेश शेट्टी या सर्वांचे जबाब पोलिसांनी सोमवारी नोंदविले. आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतने शेवटचा फोन शेट्टी याला केला होता, मात्र त्याने तो उचलला नाही, असे पोलीस चौकशीत सांगण्यात आले आहे.