अभिनेता अजय - काजोल करवीरनिवासिनी आंबाबाईच्या चरणी

 अभिनेता अजय देवगण यांने आज सहकुटुंब आंबाबाई मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. अजय पत्नी काजोल आणि आईसह महालक्ष्मीच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी आंबाबाईची खणा-नारळाने ओटी भरली.

Surendra Gangan Updated: Mar 20, 2018, 06:43 PM IST
अभिनेता अजय - काजोल करवीरनिवासिनी आंबाबाईच्या चरणी title=

कोल्हापूर : अभिनेता अजय देवगण यांने आज सहकुटुंब आंबाबाई मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. अजय पत्नी काजोल आणि आईसह महालक्ष्मीच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी आंबाबाईची खणा-नारळाने ओटी भरली.

अजय देवगण कुटुंब आज सकाळी खास विमानाने कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि देवीला अभिषेकही अर्पण केला. यावेळी अजय देवगण आणि काजोलला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.

अजय देवगण आणि काजोलला पाहण्यासाठी एकच गर्दी उसल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली.