ईशा देओलच्या लग्नात धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांची गैरहजेरी, हेमा मालिनी यांनी सांगितलं मोठं कारण

ईशा देओलच्या लग्नातील वाद समोर; हेमा मालिनी यांनी मुलांबद्दल व्यक्त केलं मत

Updated: Sep 29, 2021, 10:11 AM IST
ईशा देओलच्या लग्नात धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांची गैरहजेरी, हेमा मालिनी यांनी सांगितलं मोठं कारण  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या कामामुळे कमी तर त्यांच्या नात्यांमुळे सतत चर्चेत अधिक असतात. जेव्हा अभिनेते धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा तुफान चर्चा रंगली. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न झालं आहे. पण दोघींच्या लग्नात धर्मेंद्र  आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरचे मुलं आणि अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल गैरहजर होते. पण धर्मेंद्र यांनी दोन्ही मुलींच्या लग्नाला हजेरी लावली. ईशा देओलच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. 

ईशाने मित्र आणि उद्योगपती भरत तख्तानीसोबत 29 जून 2012 साली लग्न केलं आहे. ईशाचं लग्न हेमा मालिनी यांच्या बंगल्यात झालं. या लग्नात फक्त जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आला आलं. पण बहिणीच्या लग्नात सनी आणि बॉबी देओल यांनी दांडी मारली. ईशाच्या लग्नानंतर हेमा मालिनी यांना दोघांच्या गैरहजेरीबद्दल विचारण्यात आलं. 

यावर हेमा मालिनी उत्तर देत म्हणाल्या की, 'सनी आणि बॉबी सध्या शुटींगसाठी परदेशात असल्यामुळे येवू शकले नाहीत. त्यांची शुटींग कॅन्सल होवू शकत नाही.. त्यामुळे त्यांना लग्नाला येणं शक्य झालं नाही...' दरम्यान लग्नात दोघे आले नसल्यामुळे दोन कुटुंबामध्ये वाद असल्याची चर्चा रंगली होती. 

ईशाबद्दल सांगायचं झालं तर, ती पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. ईशा अभिनेता अजय देवगनसोबत 'रूद्र'मध्ये दिसणार आहे. 'रूद्र' हा 'लूथर' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सांगायचं झालं तर, ईशा 'काल' (2005), 'युवा' (2004) आणि 'मैं ऐसा ही हूं' (2005) या चित्रपटांमध्ये अजयसोबत दिसली होती. आता पुन्हाती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर आता ईशाला प्रेक्षक स्विकारतील की नाही हे येणारा काळचं ठरवेल.