ऐश्वर्या - अभिषेकच्या सिनेमावर #MeToo चा परिणाम

तब्बल 8 वर्षांनी येणार होती ही जोडी 

ऐश्वर्या - अभिषेकच्या सिनेमावर #MeToo चा परिणाम  title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहता येणार आहे. अनुराग कश्यपचा सिनेमा गुलाब जामून या सिनेमात दोघांना साइन देखील केलं आहे. मात्र आता या सिनेमावर संकटाचे ढग फिरताना दिसत आहे. खरं म्हणजे या सिनेमावर #MeToo चं सावट पसरलेलं दिसतं. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मंटेना आणि विकास बहलचा फॅटम फिल्मस याला प्रोड्यूस करणार आहे. विकास बहल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावल्यामुळे फँटम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम या सिनेमावर पडणार आहे. 

या सिनेमाचं शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू होणार होतं पण आता ते थांबवण्यात आलं आहे. सिनेमाचं प्री प्रोडक्शन काम सुरू झालं आहे. सध्या या सिनेमाकरता लोकेशन शोधलं जात आहे. फँटम फिल्म बंद होणार असल्यामुळे गुलाबजामची संपूर्ण टीम टेन्शनमध्ये आहे. 

ऑगस्टमध्ये या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. जवळपास 8 वर्षांनी ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमाबद्दल ऐश्वर्याला दीड वर्ष अगोदर अप्रोच करण्यात आलं होतं. पण त्यावेळी काही तरी काम सुरू असल्यामुळे ती याबाबत काही सांगू शकली नाही. पण आता तिने या सिनेमाला होकार दिला तरीही सिनेमावरील संकट काही कमी झालेली नाहीत.