'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट

Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 26, 2024, 12:27 PM IST
 'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan Crptic post : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चनविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. सगळ्यांचं लक्ष वेधणारी एक गोष्ट म्हणजे त्याच्यात आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या नात्यात काही ठीक नाही आहे. असं देखील म्हटलं जात होतं की अभिषेक आणि ऐश्वर्या हे आता एकत्र राहत नाहीत. मात्र, कोणत्याही जोडप्याकडून याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अभिषेकनं नुकत्याच केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

अभिषेकनं काल म्हणजेच गुरुवारी 25 जानेवारी रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक बच्चननं आनंद चुलानीचं एक कोट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या कोटमध्ये म्हटलं आहे की 'अपयशी होण्याची भीती आपल्या स्वप्नांना संपवतं. स्वप्नाला साकार कसं करायचं हे अपयशातून शिका.' अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विभक्त होणच्या चर्चांमध्ये अभिनेत्यानं केलेल्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ही पहिली वेळ नाही जेव्हा अभिषेक बच्चनच्या खासगी आयुष्यात एक पोस्ट शेअर केली आहे. या आधी देखील अभिषेक बच्चननं अशी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती.

Abhishek Bachchan Crptic post amid divorce rumours

हेही वाचा : भलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर'

दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंदला हा त्यांच्या लेकीला भेट केला. या बंगल्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटूंबातल काही ठीक नाही अशा बातम्या येऊ लागल्या. असं म्हटलं जातं की ऐश्वर्या बच्चनचं तिची सासू जया बच्चन यांच्याशी पटत नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे देखील सांगितलं आहे की ऐश्वर्या राय बच्चन आणि बच्चन कुटुंबासोबत राहत नाही. ऐश्वर्या ही तिच्या आईसोबत राहत असल्याचे म्हटले जाते. मात्र, या सगळ्या अफवा आल्यानंतर देखील ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र स्पॉट झाले होते. त्यात एकदा ते अगस्त्य नंदाच्या 'द आर्चिज'च्या प्रिमियरला गेले होते. तर त्यानंतर आराध्याच्या शाळेत तिच्या वार्षिक स्नेह संमेलनात. त्याशिवाय ऐश्वर्या, आराध्या आणि अमिताभ यांच्यासोबत अभिषेक बच्चनच्या पिंक पॅन्थर्स या प्रो-कब्बडीतील टीमला पाठिंबा देण्यासाठी देखील गेली होती.