Abhishek Bachchan Birthday: अभिषेकच्या तोतयानं जेव्हा बीग बींशी घेतला होता पंगा, काय होतं नेमक प्रकरण?

Throwback News: आज अभिषेक बच्चन याचा 47 वा वाढदिवस आहे. गेली चौदा वर्षाहून अधिक काळ ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात आहेत. त्यांना 11 वर्षांची आराध्या ही मुलगीही आहे.

Updated: Feb 5, 2023, 09:01 PM IST
Abhishek Bachchan Birthday: अभिषेकच्या तोतयानं जेव्हा बीग बींशी घेतला होता पंगा, काय होतं नेमक प्रकरण?   title=

Throwback News: बच्चन कुटुंबीय हे कायमच चर्चेत असतं. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत असतात तर कधी त्यांच्या चित्रपटांमधील भुमिकांमुळे ते चर्चेत राहतात. आज अभिषेक बच्चननं त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सध्या अभिषेक बच्चनची जोरदार चर्चा आहे. परंतु अभिषेक बच्चनच्या डुप्लिकेटनं (Abhishek Bachchan Duplicate) काही वर्षांपुर्वी अक्षरक्ष: मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी नक्की काय घडले होते हे कदाचित काहींना माहिती असेल किंवा काहींना आता आठवतंही नसेल परंतु 15-16 वर्षांपुर्वी अभिषेक बच्चनचा डुप्लिकेट हा चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा त्याच डुप्लिकेटची चर्चा सुरू झाली आहे. या डुप्लिकेटनं चक्क बीग बी अमिताभ बच्चन यांच्याशी पंगा घेतला होता. (Abhishek Bachchan Birthday flashback on the day when abhishek bachchan duplicate tried to threaten bachchan family)

आज अभिषेक बच्चन याचा 47 वा वाढदिवस आहे. गेली चौदा वर्षाहून अधिक काळ ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात आहेत. त्यांना 11 वर्षांची आराध्या ही मुलगीही आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यासोबतच आराध्याही चर्चेत असते. हे प्रकरण 2008 मधलं आहे.  अभिषेक बच्चन यांच्या दोन चित्रपटांमधून अभिषेकच्या डुप्लिकेट म्हणून कामही केले होते. त्याला मुंबई क्राईम ब्रान्चनं अटक केली होती. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांना एक एसएमएस करून 25 कोटी रूपयांची मागणी केली होती. देवसिंग पद्मासिंग राजपुराहित (Devsingh Padmasingh Purohit) या 25 वर्षीय तरूणाला जालोर, राजस्थान येथून एक्सटॉर्शनच्याखाली अटक केली होती.

याला एका सिने-डायरेक्टरीतून अमिताभ बच्चन यांचा फोन नंबर मिळाला होता. राजपुरोहित हा एक मिठाईच्या दुकानात काम करणारा दुकानदार होता. त्याला बच्चन कुटुंबियांनीच अनेक चित्रपटातून काम दिली होती परंतु त्याला नंतर भुमिकांसाठी विचारण्यात आले नाही म्हणून त्यानं असा धमकी वजा एसएमएस पाठवला होता. 

काय होतं 'त्या' एसएमएसमध्ये (SMS)? 

त्या एसएसएसमध्ये असं लिहिलं होतं की, तुम्हाला जर का जगायचे असेल तर दोन दिवसांमध्ये मला 25 कोटी रूपये द्या. असा तो मेसेज होता. नंतर ही व्यक्ती काही प्रकाशझोतात आली नाही. सेलिब्रेटींना असे फोन आणि ईमेल्स अनेकदा आले होते तेव्हा अशा प्रकरणांची ताबडतोब पोलिस चौकशी करण्यात आली होती. सध्या अशा प्रकारांना आळा घालणं हेही तितकंच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशावेळी सिनेजगतातील वरिष्ठ आणि जबाबदार व्यक्तींनी पुढाकरा घेणं गरजेचे आहे. मध्यंतरी कतरिना आणि विकी कौशलसोबतही असा प्रकार घडला होता. सोशल मीडियामुळे (Social Media Disadvantages) अशी प्रकरणं ही वाढताना दिसत आहेत.