Siddharth malhotra Kiara Adavni Wedding update: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidkiara Wedding) यांच्या लग्नाची. काल दिवसभर कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचेच अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचतं आहेत. कियारा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जैसलमेर या त्यांच्या वेडिंग (Jaisalmer) व्हेन्यूवरती पोहचली आहे. तिच्यासोबत तिचा खास मित्र बॉलिवूडचा विख्यात फॅशन डिझायनर सिद्धार्थ मल्होत्राही होता. त्यानंतर काहीच वेळानं रात्री सिद्धार्थंही जैसलमेरसाठी रवाना झाला असून तोही वेडिंग व्हेन्यूवर पोहचला असल्याची अपडेट त्यांच्या चाहत्यांना मिळाली तेव्हा आता कियारा आणि सिद्धार्थ कधी एकदाचे लग्नबंधनात अडकत आहेत याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या मेंदी-संगीतचे फोटोजही त्यांच्या चाहत्यांना पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. (Siddharth malhotra Kiara Adavni Wedding update sidkiara may get hitched on 7 february instead of 6 february)
6 फेब्रुवारील कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती असताच आता त्याच्या वेडिंग अपडेटमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. त्यांचे लग्न हे 6 तारखेला न होता एक दिवस पुढे म्हणजे 7 तारखेला होणार आहे, अशी माहिती समोर येते आहे. आज मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम (Siddharth Malhotra and Kiara Advani Sangeet) तर उद्या संगीत सेरेसनीचा सोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. जैसलमेरच्या सुर्यगढं पॅलेसमध्ये सिद्धार्थ - कियारा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचे संपुर्ण कुटुंबीय हे जैसलमेरला पोहचले आहे. परंतु त्यांच्या लग्नाची तारिख एक दिवस पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे.
आधी समोर आलेल्या माहितीनुसार, 6 फेबुवारीला त्यांचा विवाहसोहळा पार होणार होता. 4 फेब्रुवारीला मेहेंदी तर 5 फेब्रुवारीला हळदी आणि संगीत होणार असल्याचे समजले होते. परंतु आता कार्यक्रमात थोडासा बदल झाला आहे. सिद्धार्थ-कियाराचं लग्न 6 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला होणार असून आज म्हणजे 5 फेब्रुवारीला मेहेंदी आणि 6 फेब्रुवारीला हळदी आणि संगीत सेरेमनी होणार आहेत. त्यामुळे आता सिद्धार्थ-कियारा एक दिवस उशिरानं विवाहबंधनात अडकणार आहेत. अद्याप याबद्दल अपडेट नाही परंतु यासाठी चाहत्यांना थोडं थांबावं लागणार आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या वेडिंग लोकेशनचे फोटोज व्हायरल झाले असून आता त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कियारा आणि सिद्धार्थ कधी लग्न करणार या चर्चांना जोरदार उधाण आले होते आता प्रेक्षकांची आणि चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. सगळीकडेच फक्त कियारा आणि सिद्धार्थच्याच लग्नाची चर्चा होती. त्या दोघांनी मात्र आपलं मौन पाळलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये आलेल्या 'शेरशहा' (Shershaha) या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा दोघंही एकत्र होते तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता याआधीही ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.