Dua Lipa Abhijeet Bhattacharya : ग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका दुआ लिपानं शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या लाइव्ह परफॉर्म केलं. तिच्या कॉन्सर्टमध्ये अनेक दिग्ग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. पण तिच्या कॉन्सर्टची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा शाहरुख खानच्या 'बादशाह' या चित्रपटातील 'वो लडकी जो' हे गाणं सुरु झालं आणि त्यावर दुआ लिपानं देखील डान्स केला. या मॅशअपनं सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर सुहाना खाननं दुआ लिपाची स्तुती केली तर दुसरीकडे लोकप्रिय बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्य यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
दुआ लिपाच्या कॉन्सर्टनं एकीकडे सगळ्यांची मने जिंकली तर दुसरीकडे अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांना क्रेडिट मिळालं नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली. शाहरुख खानचं 'वो लडकी जो' हे गाणं खरंतर अभिजीत भट्टाचार्य यांनीच गायलं आहे. पण या कॉन्सर्टनंतर त्यांची चर्चा झाली नाही तर त्यांनी स्वत: समोर येऊन याविषयी सांगितलं.
अभिजीत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कॉन्सर्टची क्लिप शेअर केली आहे. ही क्लिप शेअर करत अभिजीत यांनी लिहिलं की अभिजीत आणि अनु मलिक सारख्या दिग्गजांमुळे हे गाणं हिट आणि फेमस आहे. त्याशिवा. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की 'अडचण ही आहे की कोणीही त्याविषयी बोलत नाही. वो लड़की जो... गाणं हे अभिजीतनं गायलं आहे. पण याविषयी कोणालाही माहित नाही, किंवा कोणत्याही न्यूज आउटलेट किंवा मग इन्स्टाग्राम पेजवर कलाकारांचा उल्लेख केलाच नाही. या देशात काय कलाकारांविषयीच का बोलं जातं? मला हा पूर्ण विश्वास आहे की जेव्हा दुआ लिपानं हे गाणं ऐकलं असेल तेव्हा तिनं फक्त हे ऐकलं असेल. पाहिलं नसेल आणि त्या व्यक्तीची स्तुती केली असेल, ज्यानं गाणं गायलं आहे आणि हो तो शाहरुख खान नाही. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अभिजीत भट्टाचार्य आहे आणि अनु मलिकनं याला कम्पोज केलं आहे. मी माफी मागते पण जेव्हा तुम्ही हे गाणं सर्च करता तर हेच पाहायला मिळेल, वो लड़की जो सबसे अलग है- अभिजीत.'
हेही वाचा : एकीकडे विक्रांत मेसीची Retirement, दुसरीकडे पंतप्रधान पाहणार त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट'
अभिजीत यांनी पुढे लिहिलं 'काहीही झालं तरी या देशात मीडिया गायकाला त्याचा हक्क मिळू देत नाही आणि मग लोकं मला विचारतात की तुम्ही प्रयत्न का केले नाही आणि बॉलिवूडसाठी गाणी का नाही गायली. हे शाहरुख खानविषयी नाही. मी त्याचा सगळ्यात मोठा चाहता आहे. हे आमचे प्रेक्षक आणि मीडियाविषयी आहे, जे आपल्या देशातील गायकांना पाठिंबा देत नाहीत, जसे पश्चिमात्य देशांमध्ये करतात.'