अब फर्क लाएंगे! म्हणत 'आर्टीकल १५'चं नवं पोस्टर प्रदर्शित

२८ जून २०१९ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आर्टीकल १५'

Updated: Jun 24, 2019, 05:31 PM IST
अब फर्क लाएंगे! म्हणत 'आर्टीकल १५'चं नवं पोस्टर प्रदर्शित   title=

मुंबई : आयुषमान खुरानाची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'आर्टीकल १५' या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आलं आहे. २८ जून २०१९ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
चित्रपटाच्या पोस्टरवर आयुषमानचं रुप पाहता एका जंगलामध्ये शोधमोहिमेत तो व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे 'अंधेरों मे बहुत चल लिए, अब है रोशनी की बारी', असं कॅप्शन लिहित आयुषमानने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला. चित्रपटाचा एकंदर पोस्टर पाहता प्रेक्षकांमध्येही चित्रपटाविषयीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. 
अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शित या चित्रपटात आयुषमानसोबतच ईशा तलवार, मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहम्मद जिशान हे कलाकारही झळकणार आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी यांनी लिहली आहे. 

विविध जातींच्या पेचात अडकलेले लोक. आपली जात सर्वात श्रेष्ठ समजणाऱ्या उच्चवर्णींयांमुळे समाजात पसरलेली असमानता. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांमध्ये होणारा भेदभाव इत्यादी विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. 
चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती.धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर राज्य आता आपल्या नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही, असे चित्र 'आर्टिकल-१५' चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न अनुभव सिन्हा यांनी केला. या चित्रपटात पहिल्यांदाच आयुषमान पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.