बाबा निराला ते ईशा गुप्ता 'या' स्टार्संनी 'आश्रम 3'साठी आकारली मोठी रक्कम; जाणून घ्या

आश्रम 3' ने  चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Updated: Jun 5, 2022, 07:37 PM IST
बाबा निराला ते ईशा गुप्ता 'या' स्टार्संनी 'आश्रम 3'साठी आकारली मोठी रक्कम; जाणून घ्या title=

मुंबई : आश्रम 3' ने  चाहत्यांची मने जिंकली आहेत. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनपासून ते तिसऱ्या सीझनपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून राहिली नाही तर प्रत्येक पात्र चर्चेत राहिलय. आज आम्ही आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की 'आश्रम' सीझन 3 साठी बॉबी देओल ते ईशा गुप्ता पर्यंत कोणत्या भूमिकेसाठी स्टार्सनी निर्मात्यांकडून मोठी रक्कम घेतली होती.

बॉलीवूड लाईफ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बॉबी देओलने बाबा निराला या पात्रासाठी सुमारे 1 कोटी ते 4 कोटी रुपये आकारले होते. या भूमिकेने बॉबी देओलच्या करिअरला पुन्हा उजाळा दिला.

त्रिधा चौधरीने पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बबिताची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केलं. रिपोर्ट्सनुसार, 'आश्रम 3' च्या त्रिधाने 4 लाख ते 10 लाख रुपये आकारले होते.

'आश्रम 3' मध्ये ईशा गुप्ताने यावेळी बॉबी देओलसोबत एक इंटिमेट सीन दिला होता. रिपोर्ट्सनुसार, ईशा गुप्ताने वेब सीरिजमध्ये सोनियाची भूमिका करण्यासाठी सुमारे 25 लाख ते 2 कोटी रुपये आकारले होते.

या वेब सीरिजमध्ये पोलिसाची भूमिका साकारणारा उजागर सिंगही चांगलाच लोकप्रिय झाला होता. दर्शन कुमारने उजगर सिंगची भूमिका साकारली होती. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर दर्शन कुमारने ही भूमिका साकारण्यासाठी 15 ते 25 लाख रुपये घेतले होते.

'आश्रम 3' मधील भोपा स्वामींच्या भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. चंदन रॉय सन्याल यांनी ही भूमिका साकारली होती. बातम्यांनुसार, भोपा स्वामीने ही भूमिका साकारण्यासाठी सुमारे 15 लाख ते 25 लाख रुपये आकारले होते.

या वेब सीरिजमध्ये नताशाने डॉक्टरची भूमिका साकारली आहे. अनुप्रिया गोएंका यांनी ही भूमिका साकारली होती. रिपोर्ट्सनुसार, अनुप्रियाने यासाठी 8 लाख ते 15 लाख रुपये आकारले.

अदिती पोहनकर 'आश्रम 3' मध्ये पम्मी पैलवानाची भूमिका साकारून खूप प्रसिद्ध झाली होती. रिपोर्ट्सनुसार, अदितीने हे पात्र साकारण्यासाठी 12 ते 20 लाख रुपये घेतले होते.