समुद्र किनारी टॉपलेस झाली ही 'संस्कारी बहू', त्यानंतर मात्र...

कोण आहे ती टीव्ही विश्वातील 'संस्कारी बहू'  

Updated: Dec 25, 2021, 03:57 PM IST
समुद्र किनारी टॉपलेस झाली ही 'संस्कारी बहू', त्यानंतर मात्र... title=

मुंबई : अभिनेत्री आशका गोराडिया (Aashka Goradia) गेल्या काही काळापासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आशका अनेकदा तिच्या योगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. यासोबतच ती तिच्या चाहत्यांना फिटनेसच्या टिप्सही देते, मात्र तिला बोल्ड फोटोंसाठी ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. आता आशका गोराडियाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

आशकाने इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये ती योगा करतना दिसत आहे. फोटोमध्ये आशकाचे डोके खाली आणि पाय वर असल्याचे दिसत आहे. शेअर केलेल्य फोटोमध्ये तिच्या पाठीवर #OneLove असं लिहिलं आहे. शिवाय तिने कॅप्शनमधून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

ती म्हणते, 'जे लोक तुम्हाला सर्वात कमी ओळखतात ते तुमच्याबद्दल सर्वात जास्त कसे बोलतात हे मजेदार आहे. आयुष्यभर माझे पाय आकाशात आणि माझे डोके जमिनीवर असेल, माझी पाठ मजबूत आहे, त्यामुळे द्वेष करणाऱ्यांनी स्वतःचे जीवन जगावं'

आशकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने 'कुसुम', 'बालवीर', 'नागिन' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आता तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. तिने आता अभिनय सोडून कॉस्मेटिक व्यवसायावर जोर दिला आहे. शिवाय गोव्यात तिचा आणि पती ब्रेंटची योग शाळा देखील आहे.