मुंबई : लहानपणापासूनच आपल्या अदांनी घायाळ करणारी टीव्ही अभिनेत्री आशिका भाटियाचा फिटनेस प्रवास पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटतयं. काही महिन्यांत, अभिनेत्रीने बरंच वजन कमी केलं आहे. आशिकाचे पूर्वीचे आणि आताचे फोटो पाहून तुम्हाला तिच्या या फिटनेस प्रवासाची कल्पना येऊ शकते. टिक टॉकमुळे आशिका भाटियाच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली.
आशिकानेही तिच्या हातावर डबिंग अॅपचा टॅटू काढला आहे. 2020 मध्ये आशिकाला तिच्या फोटोंमुळे खूप ट्रोल व्हावं लागलं होतं. चाहते तिच्या फिटनेसवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करताना दिसले. मात्र आता तिचे फोटो बघितले तर तुमच्या तोंडून हेच निघेल, बापरे हे किती कमाल आहे
गेल्या वर्षभरात आशिकाच्या बदललेल्या लूकने प्रेक्षकांना खात्री पटवून दिली आहे की, 'प्रयत्नार्थी परमेश्वर'. अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम सर्च केलं तर तिचा प्रवास तुम्हाला नक्की कळेल. आशिकाने टीव्हीपासून बॉलिवूडमध्येही आपल्याला सिद्ध केलं आहे. परवरिश मालिकेतून ती घराघरांत पोहचली. याचबरोबर अभिनेत्रीला प्रेम रत्न धन पायो या सिनेमातून ओळख मिळाली. या चित्रपटात आशिकाने सलमान खानच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.
ही अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे दररोज प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. पण तिचा फिटनेस प्रवास पाहून अनेकांनी तिला हे सिक्रेट विचारलं आहे. प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आशिकाने सांगितलं की, हे अचानक घडलं, मधल्या काळात मला काही खावसं वाटत नव्हत. पण मी योग्य वेळी ही सवय सुधारली आणि चांगला आहार आणि नियमित व्यायामाने माझं वजन कमी केलं.