Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. 

सायली पाटील | Updated: Feb 22, 2024, 11:52 AM IST
Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?  title=
Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Nupur Shikhare Instagram : आईचा धाक सर्वांनाच असतो. या मताशी सहमत नसणारे तसे फार कमीच असतील. कारण बालपणापासून संस्कार लावणं असो, शिस्त लावणं असो किंवा मग वठणीवर आणणं असो, आई सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलते. त्यामुळं मुलं कितीही मोठी झाली तरीही ती आईच्या शब्दाबाहेर नसतात. किंबहुना आईचा धाक हा कायम असतो, तो कधीच कमी होत नाही ही वस्तुस्थिती. 

जाणून आश्चर्य वाटेल, पण या सेलिब्रिटी मंडळींनाही आईचा तितकाच धाक. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतूनही हे स्पष्टच पाहायला मिळत आहे. जिथं आमिन खानचा जावई, (Ira Khan) आयरा खानचा पती नुपूर शिखरे आईला नेमका किती घाबरतो हे गंमतीशीर व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा पाहा : ...तर पैसे कापले जाणार; Indian Railway च्या कन्फर्म तिकीटाबाबत नवा नियम 

Healing हून आईचे फटकेच अधिक... अशा आशयाचं कॅप्शन देत नुपूर शिखरेनं इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याच्या आई, प्रीतम शिखरे यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं नुपूर सेल्फ हिलिंग करताना दिसत आहे. इथं त्याचं हे काम सुरु असतानाच तो नेमका काय करतोय हे पाहून त्याच्याही आईला प्रश्न पडला. यावर 'नोकरी सोडली, आता हे करणार' असं उत्तर दिलं आणि बस्स... 

मग काय? नुपूरच्या आईनं स्वयंपाकघरात जाऊन केरसुणी आणली आणि तिच्या हाती हे अस्त्र पाहताच नुपूरची भंबेरी उडाली. त्यानं आईचे फटके खायला मिळणार या भीतीनं घरातून धूम ठोकली. आई आणि मुलाचं अर्थात सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे आणि त्याची आई, नृत्यांगना प्रीतम शिखरे यांचं गोड नातंही या व्हिडीओतून नेटकऱ्यांना पाहायला मिळालं. तुम्ही तुमच्या आईच्या अशा कोणत्या प्रकारच्या धाकाला घाबरता? कमेंटमध्ये कळवा... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Popeye  (@nupur_popeye)

दरम्यान, नुपूर शिखरे आणि आमिरची लेक आयरा खान, काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याचीही बी टाऊनमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. मुंबईत नोंदणी पद्धतीनं लग्नबंधनात अडकल्यानंतर राजस्थानमध्ये या जोडीच्या लग्नसोहळ्याचा जंगी कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.