मोठा खुलासा : आमिर खानने अनेक रात्री एकट्याने रडून काढल्या

का आली आमिर खानवर अशी वेळ 

मोठा खुलासा : आमिर खानने अनेक रात्री एकट्याने रडून काढल्या  title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या सिनेमांमुळे आणि अभिनयामुळे खूप लोकप्रिय आहे. आमिर खानचा स्ट्रगल काळ मात्र कधीच कुणी विचारच घेत नाही. पण आमिर खानचा हा काळ खूप कठिण होता. आणि याबद्दल स्वतः आमिर खानने एका कार्यक्रमात सांगितलं आहे. 

आमिर खानच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्याने अनेक रात्री रडून काढल्या आहेत. हे कुणी दुसऱ्याने नाही तर स्वतः आमिर खानने सांगितलं आहे. मुंबईच्या स्क्रिन रायटर असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत आमिर खान पाहुण्यांच्या रुपात आला होता. तिथे आलेल्या 800 स्क्रिन रायटरसोबत आमिरने खूप गप्पा मारल्या. यांच्यासोबत आमिरने आपला सुरूवातीचा सगळा काळ उघड केला. 

आमिर खानने स्क्रिन रायटरला चिंताग्रस्त होण्याचे कारण नाही असं सांगितलं. कारण सुरूवातीच्या काळात अनेक काम आपल्या मनासारखी नाही होत. आमिरने पुढे सांगितलं की, सुरूवातीच्या काळात अनेक काम आपल्याला दुसऱ्याच्या पसंतीने करावी लागतात. मात्र 8 ते 10 सिनेमांनंतर आमिर खानचं काम लोकांना कळू लागलं.