'आपण सगळे माणसं आहोत, आपल्याकडून चूक होते...', आमिर खाननं मागितली माफी!

आमिरनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 1, 2022, 05:02 PM IST
'आपण सगळे माणसं आहोत, आपल्याकडून चूक होते...', आमिर खाननं मागितली माफी! title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिरचा चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. मात्र, 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपट प्रदर्शित फक्त प्रदर्शित झाला नाही तर तो फ्लॉप झाला. त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला किती दु:ख झालं हे सगळ्यांना माहित आहे. आता आमिरनं एक व्हिडीओ शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे. 

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

आमिरचा नुकताच प्रदर्शित झालेला 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. सोशल मीडियावर #boycottlalsinghchaddha या ट्रेंडचा परिणाम असा झाला की चित्रपटगृह पूर्णपणे रिकामे झाले. बॉक्स ऑफिस कलेक्शनही चित्रपटाचा खर्च भरू शकला नाही. 

आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न

आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं 'हे' वचन

चित्रपट फ्लॉप ठरल्यानं आमिरला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच काही वेळापूर्वी एक ऑडिओ क्लिप त्यानं शेअर केली आहे. या क्लिपमध्ये लिहिलं आहे की, 'आपण सगळं माणूस आहोत आणि चुका आपल्याकडूनच होतात. कधी नको ते बोलतो तर कधी नको ते काम करतो. कधी न कळतं तर कधी रागात. कधी मस्करीत तर कधी न बोलता. जर मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुखावले असेल, तर मला माफ करा. मी तुमची माफी मागतो.' आमिरनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

#BoycottLaalSinghCaddha हा ट्रेंड सुरू झाल्यानंतर, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. लोकांनी चित्रपट न पाहण्याचा आग्रह धरला आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला. 

आणखी वाचा : सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका

आज १ सप्टेंबर रोजी जैन धर्मातील अनेक लोक हे ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणत एकमेकांची क्षमा मागतात. जैन धर्मात पर्युषण पर्व असते. या काळात आत्मशुद्धीसाठी हे क्षमायाचना पर्व केले जाते. यात हात जोडून प्रत्येकजण एकमेकांची क्षमा मागतात. यालाच ‘मिच्छामी दुक्कडम्’ असे म्हणतात. याच पर्वाचे निमित्त साधत आमिर खानने हे ट्वीट केलं आहे.