मुंबई : आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान एकेकाळी बलिवूडचा जीव होता. त्याने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. मात्र अचानक त्याने एक्टिंगमधून एक्झिट घेतली. यानंतर त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांना बिलकूल आवडला नाही. जे त्याला स्क्रिनवर पाहण्यासाठी मिस करतात. आता त्याच्या पुनरागमनामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे. अलीकडेच 'किडनॅप' फेम अभिनेत्याने सांगितलं आहे की, त्याने शोबिज का सोडला?
वोग इंडियासोबत बोलताना इमरान खान एक्टिंगपासून दूरवण्याबाबत बोलला आहे. यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, २०१६ साली माझं करिअर खूपंच डगमगलं होतं. जिथे मी स्वत: खूप तुटलो होतो. इमरानने कबूल केलं की, त्यावेळी त्याला पैशांची चिंता नव्हती. कारण सौभाग्यमधून तो एक इंडस्ट्रीमध्ये काम करत होता ज्याने मला फायनशिअल रुपात एवॉर्ड दिला. यासाठी जेव्हा तो ३० वर्षांचा झाला तेव्हा त्याला पैशांचा विचार करण्याची गरज नव्हती.
सांगितला का घेतला ब्रेक
पुढे अभिनेत्याने सांगितलं की, मी माझ्या कामाला घेवून बिलकुल एक्साइटेड नव्हतो. अभिनेता म्हणाला, त्यावेळी हे माझं करिअर नव्हतं कारण मी यासाठी इतका उत्साहित नव्हतो की, यासाठी मला खूप मेहनत करायची होती.'' त्याच्यासाठी तो क्षण असा होता जेव्हा तो एक छोट्या मुलीचा वडिला बनला आणि त्याला कळालं की, आपल्याला अभिनेत्यापेक्षा एक चांगलं वडील व्हायचं आहे. अभिनेता पुढे म्हणाला, यानंतर मी ठरवलं की, अभिनेता होणं हे माझं काम नाही. आता मला स्वतःला सावरायचं आहे. मला आता माझ्या मुलीसाठी सर्वात आनंददायी आणि मजबूत व्हावं लागेल.
इमरान त्याच्या पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत असतो. इमरान खानचं पहिलं लग्न अवंतिका मलिकसोबत झालं होतं. मात्र त्याचं हे लग्न फार काळ टिकूव शकलं नाही आणि या दोघांचा २०११ साली घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव इमारा आहे. २०१९ मध्ये दोघांच्या वेगळ्या होण्याची बातमी समोर आली होती. अवंतिकापासून विभक्त झाल्यानंतर इम्रान पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. सध्या तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे.