Ira Khan Bedroom Photo With Husband: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बुधवारी मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकली. आमिरने मुलीचा हात नुपूर शिखरेच्या हातात दिला. दोघांचंही लग्न रजिस्टर पद्धतीने 3 जानेवारी रोजी पार पडलं. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईतील ताज एण्ड्समध्ये पार पडलेला हा विवाहसोहळा चर्चेत आहे. लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र लग्नाच्या या फोटोंमध्ये लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू आयराने तिच्या बेडरुममधील नवऱ्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.
नुपूरबरोबर लग्न केल्यानंतर आयराने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट करताना नवऱ्याबरोबर फोटोच पोस्ट केला आहे. आयराने बेडरुममध्ये नवऱ्याबरोबर काढलेला सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमधून पोस्ट केला. या फोटोमध्ये आयराने मजेदारपणे आपलं लग्न झाल्याचं म्हटलं आहे. 3 जानेवारीला आयरा आणि नुपूरचं नोंदणी पद्धतीने लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आयराने पती नुपूरबरोबर एक गोंडस सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघेही फार आनंदात दिसत आहे.
आयराने शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिरच्या मुलीने तिच्याकडील जुनाच 'ब्राइड टू बी' लिहिलेला हेअर बॅण्ड घातला आहे. मात्र लग्नानंतर तीने यात बदल केला आहे. नुपूरने पतीबरोबर बेडरुममध्ये क्लिक केलेल्या सेल्फीत 'ब्राइड टू बी' बॅण्ड घातला असला तरी त्यामधील 'टू बी' म्हणजेच होणारी हा शब्द खोडला आहे. आयराने लग्न झाल्याचं अधोरेखित करण्यासाठी वापरलेली ही आयडिया अनेकांना पसंत पडली असून या गोष्टीने बऱ्याच जणांचं लक्ष वेधून घेतलं.
नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना तो मार्गदर्शन करतो. आयरा आणि नुपूरची पहिली भेट जिममध्येच झाली. 2020 पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये नुपूर आणि आयरा यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर अनेकदा हे दोघे एकत्र दिसून आले. बुधवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्याला आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्ता आणि मुलगा जुनैद खानही उपस्थित होते. तसेच आमिरची दुसरी पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद राव खानही लग्नाला हजर होते.
इरा आणि नुपूर हे बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ते दोघेही उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उदयपूरमध्ये लग्नाचे विधी, संगीत, हळद हे सभारंभ होतील, अशी माहिती समोर येत आहे. बुधवारपासून सुरु झालेला हा सोहळा पुढील 10 दिवस चालणार आहे. लग्नाच्या कार्यक्रमांना 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून हे कार्यक्रम 13 जानेवारीपर्यंत चालतील. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत 13 जानेवारीला एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.