'आता पॉवर गेम चालणार नाही...' मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या सर्वत्र लोकप्रिय आहे या मालिकेची सर्वत्र क्रेझही सुरू आहे. त्यातून आता मधूराणी हिचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. यावेळी तिनं लग्नसंस्थेवर भाष्य केले आहे. नक्की ती काय म्हणाली आहे या लेखातून जाणून घेऊया 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 25, 2023, 10:17 PM IST
'आता पॉवर गेम चालणार नाही...' मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत  title=
aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar talk on marrigae women and men dominated society

Madhurani Prabhulkar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मधुराणी प्रभुलकर हिची. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रचंड गाजते आहे. त्यामुळे मधुराणी यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी तिनं नुकत्याच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिनं लग्नसंस्था, स्त्रिया आणि पुरूषांची मक्तेदारी यावर भाष्य केले आहे. तिनं यावेळी आपली मतं मांडली आहेत. सोशल मीडियावरही मधूराणी खूपच चर्चेत असते. ती तिचे सुंदर फोटोही शेअर करत असते. त्याचबरोबर विविध स्टेटसही ठेवताना दिसते त्यामुळे सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा असते. त्यातून तिचे फॉलोवर्सही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तिच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स तिचे चाहते करताना दिसतात. यावेळी तिची एक मुलाखत ही विशेष गाजते आहे. तेव्हा चला तर पाहुया यावेळी मधुराणीनं काय भाष्य केले आहे. 

तिनं एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी तिनं त्यांच्या 'छापा काटा' या क्रार्यक्रमात सहभाग दर्शवला होता. यावेळी ती म्हणाली की, स्त्रिया आता सक्षम होत आहेत. आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या स्त्री आता सक्षम होत आहे. त्यामुळे आता स्त्री जशी आहे, तसं जर तुम्ही तिला स्वीकारलं नाही आणि तुम्ही स्वत:मध्ये जर बदल केले नाहीत, तर लग्नसंस्था वैगेरे मोडकळीला येणार आहे. आता तुम्हाला नवीन पद्धतीने या संस्थेकडे बघायला पाहिजे. तर ती टिकणार आहे आणि टिकली नाही तरी चालेल, मोडू देत. कारण त्यातून नाविन्य निर्माण होणार आहे.

लग्नसंस्था कशामुळे मोडतात, याचं विश्लेषण जर आपल्या पिढीने किंवा तुमच्या पिढीने केला आणि त्यांच्या पुढच्या पिढीने केला, तर त्याचे नवीन व्हर्जन येईल. आता पॉवर गेम चालणार नाही. ती एक सक्षम स्त्री आहे आणि मला माझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी तिला स्वीकारायचं आहे. मी तिला कमी लेखणार, मी तिला कंट्रोल करणार हे असं आता होणार नाही, असं ती म्हणाली आहे. 

हेही वाचा - लेकीसह 'बार्बी' बघायला गेली आणि 10 मिनिटात थिएटरबाहेर आली; Barbie च्या निर्मात्यांवर भडकली अभिनेत्री

“पुरुषांनी आता दबलंच पाहिजे. हे आता व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय त्यांना स्त्रियांचं दु:ख कसं कळेल. इतके वर्ष तुमची ओरड बस्स झाली आता. जर तुम्ही आता तुमच्यात बदल केले नाहीत, तर स्त्रिया तुम्हाला फाट्यावर मारणार आहेत. हे आता पुरुषांनी मान्य करायला हवं”, असं ती म्हणाली.