Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीसाठी यश का आहे खास?

घटस्फोटानंतर अरूंधती एकटीच आईकडे जाणार का?

Updated: Aug 4, 2021, 04:34 PM IST
Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीसाठी यश का आहे खास?  title=

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत लोकप्रिय पात्र अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट झाला आहे. अरूंधती आणि अनिरूद्ध यांच्यातील गेल्या वर्षभराचा काळ हा अतिशय कठीण होता. अरूंधती घटस्फोट झाल्यानंतर डोंबिवलीत आपल्या आईकडे गेलीय. (Aai Kuthe Kai Karte : Why Yash is so closed to her mother Arundhati?) 

पण तिच्या या संपूर्ण काळात यश अतिशय खंबीरपणे उभा राहतो. अरूंधतीच्या तिन्ही मुलांपैकी यश तिच्या घटस्फोटाच्यावेळी देखील न सांगता आईसाठी धावून येतो. संजना आणि अनिरूद्ध यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर अरूंधती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते. अरूंधतीसाठी हा निर्णय आणि एका वर्षाचा कालावधी हा खडतर होता. पण या कालावधीत यश अरूंधतीचा मोठा आधार बनतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अनिरूद्ध आणि संजनाचं नातं कळल्यावर यशने अरूंधतीला वेगळ होण्याचा निर्णय घेताना साथ दिली. अरूंधती आणि अनिरूद्धला तीन मुले अभिजीत, यश आणि इशा. अभिजीतवर कायमच वडिलांचा म्हणजे अनिरूद्धचा पगडा राहिला. त्यामुळे त्याने कळत नकळत आईचा म्हणजे अरूंधतीचा अपमान केला. त्यानंतर इशा ही कायमच अल्लड राहिली. लाडावलेली आणि वडिलांवर सर्वाधिक प्रेम करणारी. आईचं वेगळेपण तिला कळलंच नाही. पण यश हा कायमच आईच्या म्हणजे अरूंधतीच्या बाजूने राहिला आहे. 

यशचं वेगळेपण कायमच दिसलं आहे. मग ते कधी संजनाला सडेतोड उत्तर देणं असो वा वडिल आणि कुटुंबियांच्या विरोधात जाऊन गौरीसोबत ठाम राहणं असो. यश लग्नानंतरही गौरीला घेऊन अरूंधती जेथे असेल तेथे जाणार असल्याच म्हणतो. त्यामुळे यश हा कायमच अरूंधतीसोबत असेल असा विश्वास अप्पा आणि खास करून कुटुंबियांना आहे. 

अरूंधतीचा घटस्फोट होतो तेव्हा ती कुणालाही सोबत येऊ नका असं ठाम सांगते. मात्र तसं असूनही यश तेथे पोहोचतो. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्यावरही अरूंधती ठाम राहते. मात्र गळ्यातून मंगळसूत्र काढताना अरूंधती कोलमडते. आणि त्याच क्षणी यश तेथे पोहोचतो. हेच यशचं वेगळेपण यावेळी अधोरेखित होतं. 

यशची भूमिका अभिषेक देशमुख साकारत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला हे पात्र उतरत आहे.