मुंबई : 'आई कुठे काय करते', मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. मालिकेने आता वेगळं वळण घेतलं आहे. मालिकेत अरूंधती आणि आशुतोषची मैत्री झाली आहे. त्यामुळे आता अरूंधती आणि आशुतोषची मैत्री फुलत आहे. असं असताना मालिकेवर कोरोनाच सावट आलं आहे.
मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिला कोरोनाची लागण झाली आहे. रूपालीला ताप येत असल्यामुळे RT-PCR टेस्ट केली. तेव्हा कोरोनाची लागण झाल्याचं समजलं.
रूपालीचा रिपोर्ट आला तेव्हा ती आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरच शुटिंग करत होती. रूपालीचा रिपोर्ट येताच तात्काळ मालिका थांबवण्यात आली. लगेचच सगळं शुटिंग शेड्युल रद्द करण्यात आलं आणि इतर कलाकारांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितलं.
सर्व काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली आहे. योग्य ती खबरदारी सांभाळत मी स्वतःला घरीच आयसोलेट केलं आहे. मला विश्वास आहे लवकरच मी उत्तम होऊन बाहेर येईन, रूपालीने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून शेअर केली आहे.
रुपालीनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र 'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे तिला फार प्रसिद्धी मिळाली. तसंच सुमीत राघवनसोबत 'बडी दूर से आये है' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं. रुपाली 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये सहभागी झाली होती.