मुंबई : अनुपम खेर हे बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे. ते नेहमीच आपल्या अभिनय आणि व्यक्तिरेखांसाठी चर्चेत असतात. असं असूनही, नुकतीच अनुपम खेर यांच्या आयुष्यात अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की, इतकं नाव मिळवूनही जग त्यांना ओळखत नाही, मग त्यांनी पाण्यात बुडलं पाहिजे. वास्तविक, अनुपम खेर आजकाल त्यांच्या मूळ गावी शिमला येथे आहे. तिथे त्यांनी एका रहिवाश्यासोबत बातचित केली, त्यावेळी त्या माणसाने त्यांना ओळखण्यास नकार दिला.
अनुपम खेर यांना जेव्हा त्या व्यक्तीने ओळखलं नाही तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. सकाळी अनुपम खेर जेव्हा मॉर्निंगवॉकसाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली. अनुपम खेर यांनी आपल्या कु अॅप अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की अनुपम खेर यांनी त्या व्यक्तीला त्याचं नाव विचारलं आणि त्याला उत्तर म्हणून त्याने ज्ञानचंद असं सांगितलं.
तुम्ही मला ओळखता का?
यानंतर अनुपम यांनी त्याला सांगितलं की, मी अनुपम खेर आहे, मात्र त्या व्यक्तीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. दरम्यान, अनुपम खेर यांनी त्याचा मास्क काढला, परंतु तरीही ती व्यक्ती त्यांना ओळखू शकली नाही. यानंतर, बोलता-बोलता अनुपम खेर यांनी त्याला विचारलं, तू मला ओळखतोस का? त्या माणसाने उत्तर दिलं - "नाही". हे ऐकून अनुपम खेर म्हणाले की, ही किती चांगली गोष्ट आहे की, लोक आपल्याला ओळखत नाहीत.
ज्ञानचंदला ओळख मिळाल्यावर अनुपम खेर एक मजेदार पद्धतीने म्हणाले की "यावेळी मी गुडघ्याभर पाण्यात बुडलो असं मला वाटलं." यानंतर, ज्ञानचंद म्हणाला की, सर तुम्हाला ओळखलं नाही कारण तुम्ही मास्क घातला होता पण आता मी तुम्हाला ओळखलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “मी नेहमी अभिमानाने म्हणतो की मी 518 चित्रपट केले आहेत. मी असं मानतो की किमान आपल्या भारतात मला प्रत्येकजण ओळखतं. मात्र शिमला जवळ डोंगराच्या पायथ्याशी असलेला ज्ञानचंदने माझा गैरसमज दूर केला. तेही इतक्या निर्दोषतेने. हा व्हिडिओ पहा आणि मोठ्याने हसा" अनुपम खेरचा यांचा हा व्हिडिओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.