मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक असे चित्रपट आणि अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्या फार कमी वेळात प्रसिद्ध झाल्या, पण तितक्याच कमी वेगात या अभिनेत्री प्रसिद्धीझोतातून मागेही गेल्या. याच अभिनेत्रींमध्ये असणारं एक नाव म्हणजे, अभिनेत्री मंदाकिनी.
'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून ती प्रसिद्धीझोतात आली. पण, एका कुख्यात गुंडाशी तिचं नाव जोडलं गेलं आणि कारकिर्दीचा उतरता काळही तिनं पाहिला.
एकाएकी मंदाकिनी प्रसिद्धीझोतापासून दूर गेली आणि ती पुन्हा जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हा तिचं रुप पूर्णपणे बदललं होतं. 1985 मध्ये तिनं 'मेरा साथी'मधून पदार्पण केलं होतं.
तिला खरी ओळख मात्र राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानं दिली. चित्रपटातील तिचे बोल्ड सीन प्रचंड गाजले.
त्यातही धबधब्यापाशी तिचं अंघोळ करतानाचं दृश्यही बराच चर्चेत आला होता. या चित्रपटानंतरही ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली होती. पण, दाऊदसोबत तिचं नाव जोडलं गेलं आणि हे चित्र बदलू लागलं.
पुढे तिनं कला जगतातून काढता पाय घेतला आणि बौद्ध भिक्खू डॉ. कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न केलं. पुढे 6 वर्षांनंतर ती चित्रपटांतून दिसेनासी झाली.
त्यानंतर मात्र ती जेव्हा प्रेक्षकांसमोर आली, तेव्हा मात्र तिचं रुप बदललं होतं. तिला यावेळी ओळखणंही कठीण झालं होतं.