मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे भारतीय नाहीत. तरी देखील त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने भारतीयांवर भूरळ घातली आहे. पाहुया कोण आहेत या भारताच्या नागरिक नसलेल्या अभिनेत्री...
कतरिनाचे खरे नाव टॉरकूटो आहे. १६ जुलै १९८३ मध्ये हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला. कतरिना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. हाँगकाँगमध्ये जन्म झाला असला तरी तिचे नागरिकत्व ब्रिटनचे आहे. कतरिनाने बॉलिवूड सिनेमा बूम (2003) मधून सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली.
बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरीचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. नरगिस एक अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पण सध्या ती बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे. २०११ मध्ये रॉकस्टार सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचे नागरिकत्व पाकिस्तानी चेक आणि अमेरिकन असे मिक्सअप आहे. ती स्वतःला ग्लोबल सिटीजन मानते.
जॅकलिन श्रीलंकन आहे. ११ ऑगस्ट १९८५ मध्ये मनामामध्ये तिचा जन्म झाला. जॅकलिनने तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला २००९ पासून अलादीन सिनेमातून सुरुवात केली. सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर ती मर्डर 2 मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकली. तिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.
कॅनाडामध्ये जन्मलेली बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आज बॉलिवूडची बेबी डॉल आहे. तिचा जन्म १३ मे १९८१ मध्ये झाला. ती इंडियन-अमेरिकन मॉडेल अभिनेत्री आहे. सनीचे नागरिकत्व कॅनाडाई-अमेरिकन आहे.
एली अवराम स्वीडिश अभिनेत्री आहे. पण सध्या ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. सध्या ती प्रजेंटर आणि होस्ट म्हणून काम करत आहे. तर कधी आयटम नंबर करतानाही दिसते. तिचे नागरिकत्व स्वीडनचे आहे.