‘अक्सर २’चा दुस-या ट्रेलरचा धुमाकूळ, श्रीसंतचा लूक ठरतो आकर्षण

इमरान हाश्मीमुळे ‘अक्सर’ सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या सिनेमातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता ‘अक्सर २’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. ‘अक्सर २’चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

Updated: Nov 6, 2017, 07:11 PM IST
‘अक्सर २’चा दुस-या ट्रेलरचा धुमाकूळ, श्रीसंतचा लूक ठरतो आकर्षण title=

मुंबई : इमरान हाश्मीमुळे ‘अक्सर’ सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या सिनेमातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता ‘अक्सर २’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. ‘अक्सर २’चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

या सिनेमातून प्रेक्षकांना रोमान्ससोबतच सस्पेंस थ्रिलरचा तडका बघायला मिळणार आहे. या ट्रेलरमधून क्रिकेटर श्रीसंत याचाही लूक बघायला मिळत आहे. 

झरीन खान, गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचा दुसरा ट्रेलर सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. पहिला धमाकेदार ट्रेलर साधारण ७,४५०,६२५ लोकांनी पाहिला होता. आता दुसरा ट्रेलरही गाजत आहे. 

हा सिनेमा १७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अशात हा ट्रेलर रिलीज केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. यात झरीन खान बोल्ड अवतारात दिसणार आहे.