दोन दिवसात 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाने कमवले ऐवढे कोटी

चित्रपटात वरूण भारतीय डान्सर तर श्रद्धा पाकिस्तानच्या डान्सरची भूमिका साकारताना दिसत आहे. 

Updated: Jan 26, 2020, 10:39 PM IST
दोन दिवसात 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाने कमवले ऐवढे कोटी  title=

मुंबई : २४ जानेवारी रोजी अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर स्ट्रीट डांसर 3डी (street dancer 3d) चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला. चाहत्यांना आणि नृत्यप्रेमींना हा चित्रपट चांगलाच पसंतीस पडला आहे. तर फक्त दोन दिवसांत चित्रपटाने कमालीची कामगिरी केली आहे. चित्रपटात वरूण भारतीय डान्सर तर श्रद्धा पाकिस्तानच्या डान्सरची भूमिका साकारताना दिसत आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी १०.२६ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. शनिवारी चित्रपटाने १३.२१ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. दोन दिवसांत चित्रपटाने २३.४७ रूपयांचा गल्ला जमा केला. 

कधीच दुसऱ्या क्रमांकावर न राहण्याचा वरूणच्या जीवनाचा नियम चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आला आहे.  'हम लोक एक कभी नही हो सकते..' भारत आणि पाकिस्तान हे दोन देश पारंपरिक शत्रू म्हणून ओळखले जातात. 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारत आणि पाकिस्तानमधील नृत्याची जुगलबंदी अनुभवता येणार आहे.  

आतापर्यंत खेळाच्या मैदानात आणि राजकारणात हे दोन देश एकामेकांच्या समोर आले. पण आता नृत्यांच्या मंचावर देखील भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले आहेत.

चित्रपटामध्ये नृत्याचे गुरू प्रभूदेवांची भूमिका फारच कमालीची आहे. वरूणचा आगामी चित्रपट 'एबीसीडी'चा तिसरा भाग आहे. चित्रपटाच्या दोन भागांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. नृत्याच्या बाबतीत असणारी ओढ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.