Alia Bhatt 2022 Journey : 2022 हे वर्ष आलिया भट्टसाठी भाग्यवान ठरलं असं म्हणायला हरकत नसावं. आलिया भट्टची उत्तम कामगिरी या वर्षात पाहायला मिळाली. या वर्षी आलिया भट्टने अनेक अभिनेत्रींना मागे टाकत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. आलिया भट्टने रविवारी सकाळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या गोड बातमीमुळे कपूर कुटुंबात पुन्हा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला. आलियाच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप संस्मरणीय ठरले आहे. या वर्षी त्यांच्या आयुष्याला अनेक गोष्टींनी वळणं मिळाली.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास आलिया आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिलला झाले. लग्नाआधी दोघेही बराच काळ डेट करत होते. ब्रह्मास्त्रच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. लग्नाच्या सुमारे अडीच महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. सोनोग्राफी करतानाचा फोटो तिने पोस्ट केला होता आणि ६ नोव्हेंबरला ती आई झाली. प्रेग्नेंसीच्या काळात आलिया खूप सक्रिय राहिली. (2022 has been a special year for Alia Bhatt because of her pregnancy and marriage nz)
आलियाचा या वर्षी पहिला रिलीज झालेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट होता, जो 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील काही यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. गंगूबाईचे 100 कोटींहून अधिकचे निव्वळ कलेक्शन होते आणि या चित्रपटाद्वारे आलियानेही तेलुगूमध्ये पदार्पण केले.
यानंतर, २५ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या एसएस राजामौली यांच्या आरआरआरमध्येही (RRR) आलिया मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटाने 270 कोटींहून अधिक कमाई केली.
रणबीरसोबत लग्नानंतर आलियाचा पहिला रिलीज, ब्रह्मास्त्र भाग-1: शिवा 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 250 कोटींचे निव्वळ कलेक्शन केले आहे. आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे. त्यामुळेच आलियाने बेबी बंप असताना ही या चित्रपटाचे प्रमोशन केले.
आलियाने या वर्षी तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनसाठी देखील शूट केला आहे, ज्यामध्ये ती गॅल गॅडोटसोबत (Gal Gadot) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
2022 मध्ये, आलियाचा पहिला होम प्रोडक्शन चित्रपट डार्लिंग्स या वर्षी नेटफ्लिक्सवर आला. आलियाच्या कंपनी इटर्नल सनशाइनने शाहरुख खानच्या रेड चिलीजसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. या डार्क कॉमेडी चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत होते.
कलाकार आणि निर्मात्याशिवाय आलियाची आणखी एक बाजू या वर्षी पाहायला मिळाली. आलिया बिझनेस वुमन बनली. तिने किड्स वेअरसह तिचा प्रसूती पोशाख ब्रँड एडामामा लॉन्च केला. आलियाने तिच्या गरोदरपणात कपडे बदलण्याच्या अनुभवाच्या आधारे डिझायनिंग केले.