शाहीद कपूरचं मुंबईतलं नवं अलिशान घर पाहिलं का? घराची किंमत इतक्या कोटींमध्ये

Shahid Kapoor new luxurious house : शाहीद कपूरच्या नवीन घराची झलक.

Updated: Nov 7, 2022, 07:28 PM IST
शाहीद कपूरचं मुंबईतलं नवं अलिशान घर पाहिलं का? घराची किंमत इतक्या कोटींमध्ये title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) याने आणखी एक घर खरेदी केलं आहे. त्याने आपल्या या नव्या घराची झलक दाखवली आहे. त्याने काही फोटो शेअर केले आहेत. शाहीद कपूर आपल्या कुटुंबासह या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. त्याच्या या नव्या घराची चाहत्यांमध्ये देखील उत्सूकता दिसतेय. (Shahid kapoor new home price)

शाहीद कपूरच्या घराची किंमत कोटींमध्ये

शाहीद कपूरने नवं डुप्लेक्स घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत जवळपास 58 कोटी रुपये आहे. मुंबईच्या वरळी भागात शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) यांनी हे घर 2018 मध्ये बुक केले होते. कोरोनामुळे तो या घरात शिफ्टींग करु शकला नव्हता. पण आता तो या नव्या घरात शिफ्ट झालाय. शाहिद कपूरने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बालकनीमध्ये उभा आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Shahid and meera new home) यांनी आपलं नवीन घर छान सजवलं आहे. अभिनेत्याची पत्नी मीरा राजपूर हिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो देखील शेअर केले आहेत. सप्टेंबर महिन्यात शाहिद आपल्या कुटुंबासह या घरात राहायला आला आहे.

शाहीद कपूरचं हे घर 42 आणि 43 व्या मजल्यावर आहे. एका फोटोमध्ये मीरा ही लिव्हिंग रूममध्ये बसलेली दिसत आहे.