स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी...लवकर करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ११७ रिक्त पदांसाठी भरती होतेय.

Updated: Mar 21, 2018, 10:43 AM IST
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी...लवकर करा अर्ज title=

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ११७ रिक्त पदांसाठी भरती होतेय.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज भरु शकात. रिक्त पदांमध्ये स्पेशल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह आणि डेप्युटी मॅनेजर या पदांचाही समावेश आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०१८ आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. 

स्पेशल मॅनेजमेट एक्झिक्युटिव्ह पदे - ३५(अनारक्षित-१९)

नोकरीचे ठिकाण - मुंबई, दिल्ली
पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतन फायनान्समध्ये सीए/आईसीडब्ल्यूए/एसीएस/एमबीए अथवा दोन वर्षाचा पीजी डिप्लोमा. संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा - कमीत कमी ३० ते ४० वर्षे
वेतन - 42020 से 51490 रुपये.
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

डेप्युटी मॅनेजर लॉ पद - 82 (अनारक्षित-42)

पात्रता - मान्यताप्राप्त युनिर्व्हसिटीमध्ये तीन ते पाच वर्षांची डिग्री. संबंधित क्षेत्रातील चार वर्षांचा कामाचा अनुभव
वयोमर्यादा - २५ ते ३५ वर्षे
वेतन - 31705 से 45950 रुपये
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे होईल.
महत्त्वाची सूचना - एससी/एसटी जातीत मोडणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट

शुल्क - सामान्य/ओबीसीसाठी ६०० रुपये. एससी/एसटी/दिव्यांगांसाठी १०० रुपये.
हे शुल्क क्रेडिट/डेबिट/नेट बँकिंगद्वारे केले जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया

उमेदवारांना एसबीआयची वेबसाईटलाhttps://www.sbi.co.in/careers लॉगइन करावे लागेल. होमपेज सुरु झाल्यावर जॉईन एसबीआय सेक्शनमध्ये करंट ओपनिंग्सवर क्लिक करा. क्लिक करताच नवे वेबपेज सुरु होईल. आता Recruitment of Specialist Cadre Officers वर क्लिक करा. आता डाउनलोड एडवर्रटाइजमेंट वर क्लिक करा. असे केल्याने जाहिरात ओपन होईल. 

महत्त्वपूर्ण सूचना - ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०१८ आहे. त्यासोबत शुल्क भरण्याची अंतिम तारीखही ७ एप्रिल आहे.