मुंबई : यूपीएससीच्या परीक्षेत मराठी मुलीने बाजी मारत देशात मुलींमध्ये पहिला येणाचा मान पटकावला आहे. या परीक्षेत राज्यातील पाच विद्यार्थी पहिल्या पन्नासमध्ये आले आहेत. आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८ च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात सृष्टीने यश मिळविले आहे. महाराष्ट्राची कन्या सृष्टी देशमुख हिने देशात पाचवा क्रमांक तर कनिष्क कटारिया याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर देशात अक्षत जैन दुसरा, तर जुनैद अहमद तिसरा आला आहे.
यूपीएससी २०१८ च्या परीक्षेत एकूण ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १८० विद्यार्थ्यांनी आयएएस, ३० विद्यार्थ्यांनी आयएसएस तसेच १५० विद्यार्थ्यांनी आयपीएस रँक मिळविली आहे. तर ग्रुप ए मधून ३८४, ग्रुप बी मधून ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि ग्रुप ए, ग्रुप बी च्या केंद्रीय लोकसेवेसाठी निवड केली जाते.
Kanishak Kataria, AIR 1 in #UPSC final exam: It's a very surprising moment. I never expected to get the 1st rank. I thank my parents, sister & my girlfriend for the help & moral support. People will expect me to be a good administrator & that's exactly my intention. #Rajasthan pic.twitter.com/IBwhW8TJUs
— ANI (@ANI) April 5, 2019
यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांनी पहिल्या पन्नासमध्ये आले आहे. यात सृष्टी देशमुख ही पाचवी, तृप्ती धोडमिसे ही सोळावी, वैभव गोंदणे यांने २५ वा क्रमांक पटकावला आहे. मनिषा आव्हाळे ३३ वी, हेमंत पाटील ३९ वा आला आहे. तसेच राज्यातील स्नेहल धायगुडे हिने १०८ वा क्रमांक पटकावला. मनोज महाजनने १२५ क्रमांक तर साईप्रसाद धूत याने देशात १२९ वा क्रमांक पटकावला आहे.
Srushti Jayant Deshmukh: UPSC exam is a long journey where you are committed for 1-1.5 years. My parents, family, friends & teachers supported me, so the credit goes to them. I had decided that my first attempt is my last attempt & I was determined to clear it in one attempt. pic.twitter.com/AwgxbphTZh
— ANI (@ANI) April 5, 2019
कनिष्क कटारिया : १३३६६४
अक्षत जैन : ११०४४०७
जुनैद अहमद : ०८६३५६९
श्रेयांस कुमात : ०८५६८३७
सृष्टी जयंत देशमुख : ०४०४०३२
शुभम गुप्ता : १७०५५९४
कर्नाटी वरूणरेड्डी : ६३१४२८६
वैशाली सिंह : ६४१३७७५
गुंजन द्विवेदी : २६३०२०४
तन्मय शर्मा : ०८७९८८८