Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल

शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.

Updated: Sep 4, 2018, 08:57 PM IST
Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल title=

मुंबई : शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो, आभार मानताना, काही छोट्या भेटवस्तू देखील देत असतो. जर तुम्ही देखील या शिक्षक दिनाच्या दिवशी तुमच्या शिक्षकांना काही खास गिफ्ट देऊ इच्छितात, तर आमच्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत, त्यानुसार तुम्ही तुमच्या शिक्षकांना लहानशी भेट वस्तू देऊ शकतात.

या भेटवस्तू तुमच्या बजेटमध्ये फिट असतील, तसेच तुमच्या शिक्षकांनाही पसंत पडतील.

पेन आणि डायरी

ही अशी भेटवस्तू आहे, जी शिक्षकांना पसंत असते. कारण त्यांचं कामंच यासोबत सुरू होतं. यासाठी तुमच्याकडून याशिवाय कोणती चांगली भेटवस्तू राहू शकत नाही. या डायरीसोबत एका स्वतंत्र कागदावर एखादी कविता किंवा शुभेच्छा देखील तुम्ही लिहून देऊ शकतात.

पुस्तक

वाचन करणे, शिक्षकांना आवडतं, तेव्हा त्यांच्या पसंतीची एखादी कादंबरी देखील तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकतात. मार्केटमध्ये एकाचवेळी अनेक पुस्तकं एकाच वेळी मिळतात. ते देखील देऊ शकतात, किंवा एखाद्या लायब्ररीचं मेंबरशीप कार्ड देखील तुम्ही देऊ शकता.

ग्रीटिंग्स

काही लोकांना वाटेल हे भेटवस्तू देण्याची ही जुनीच कल्पना आहे. पण असं काही नाही. काही गिफ्ट हे सदाबहार असतात. ग्रिटिंग्समध्ये आपल्या मनातली गोष्ट लिहून तुम्ही देऊ शकतात.

फोटो फ्रेम 

जुन्या आणि खूप आनंद देणाऱ्या आठवणी एकत्र करून, तुम्ही त्याला फोटोफ्रेम करून भेट म्हणून देऊ शकतात. असली फोटोफ्रेम त्यांना खूप आवडेल.

फूल आणि चॉकलेट

ही खूप साधी आणि वेगळी कल्पना आहे, शिक्षकांना त्यांचे आवडते फूल आणि चॉकलेट देऊ शकतात.