१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

 तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 2, 2017, 07:19 PM IST
१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी title=

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल. महत्वाचं म्हणजे या भरती प्रक्रीयेसाठी शैक्षणिक पात्रता केवळ १०वी पास आहे. त्यामुळे १०वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच आहे.

एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यामध्ये सहाय्यक स्टोअर किपर, टेक्निकल ऑपरेटर (ड्रीलिंग), हॅन्डक्राफ्ट प्रमोशन ऑफीसर, स्टॉकमन (ज्युनिअर ग्रेड), ज्युनिअर केमिस्ट, क्लिनर या पदांचा समावेश आहे.

इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१७ आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपल्या वेबसाईटवर या नोकरीसंदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी http://www.sscnwr.org या लिंकवर क्लिक करा.