या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Updated: Jul 8, 2017, 08:41 PM IST
या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. सातवीपर्यंत असेलल्या शाळेत सुमारे ४७१ विद्यार्थी- विद्यार्थिनी शिकतात. मात्र त्यांना शिकवण्यासाठी केवळ दोनच शिक्षक आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे शिक्षक उपलब्ध नाहीत  म्हणून सातवीचेच विद्यार्थी खालचे वर्ग सांभाळतात. यातून सगळ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. 

या शाळेत किमान ९ शिक्षकांची आवश्यकता आहे. महापालिकेचं शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यामुळे शिक्षकांची नियुक्ती रखडलीय. मात्र महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाहीये. 
       
मुलांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत घालणं सामान्य नागरिकांना परवडत नाही.  त्यामुळे ते त्यांना महापालिकेच्या शाळेत घालतात. मात्र इथे त्यांच्या शिक्षणाची ही  अशी हेळसांड सुरु आहे. शिक्षणाच्या माहेरघरात प्राथमिक शिक्षणाची ही अवस्था आहे. कारभारी बदलले तरी इथला कारभार बदलत नाही हेच खरं..