नवी दिल्ली : आता, एका केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमात स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गुरु गोळवलकर यांचाही समावेश होणार आहे.
सोबतच विनायक दामोदर सावरकर, दीनदयाल उपाध्याय यांचाही राजकीय विचारवंत म्हणून राज्यशास्त्र या विषयात अभ्यास केला जाणार आहे.
हरियाणा केंद्रीय विद्यापीठानं हा निर्णय घेतलाय. 'एमए'च्या अभ्यासक्रमात होणाऱ्या या बदलांना 'बोर्ड ऑफ स्टडीज'ची मंजुरी मिळालीय. एमएच्या दुसऱ्या वर्षातील तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये हा अभ्यास असेल.
रवींद्रनाथ टागोर, दयानंद सरस्वती, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय.